Income Tax:  Dolo-650 औषधे बनवणाऱ्या कंपनीवर कर चोरी प्रकरणात आयकर विभागाचा छापा
Drug | (Photo Credit: Archived, edited, representative images)

आयकर विभागाच्या (Income Tax) 20 अधिकाऱ्यांच्या एका पथकाने बंगळुरुतील मायक्रो लॅब्स लिमिटेड (Micro Labs Limited) कंपनीवर आज छापेमारी केली. मायक्रो लॅब्स लिमिटेड ही Dolo-650 हे औषध बनवते. कंंपनीने मोठ्या प्रमाणावर करचोरी केल्याचे तपासात पुढे आल्याने आयकर विभागाने ही कारवाई केल्याची माहिती आहे. मायक्रो लॅबची कार्यालये देशा विविध ठिकाणी आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार आयकर विभागाने देशभारातील या कंपनीच्या 40 ठिकाणांवर छापेमारी केली आहे.

मायक्रो लॅब्स लिमिटेड कंपनीचे डीएम दिलीप सुरीना आणि डायरेक्टर आनंद सुराना यांच्याही घरावर आयकर विभागाने कारवाई केली आहे. प्राप्त माहितीनुसार दिल्ली, सिक्कीम, पंजाब, तामिळनाडू, गोवा या ठिकाणी असलेल्या कंपनी कार्यालये आणि संबंधित ठिकाणांवरही छापेमारी करण्यात आली. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, आयकर विभागाच्या कारवाईत, कंपनीच्या बंगळुरुमधील रेस कोर्स रोडवरच्या कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. (हेही वाचा, Income Tax Notice to Sharad Pawar: शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस, निवडणूक शपथपत्रांसदर्भात मागितले विवरण)

Dolo-650 औषधांचा वापर कोरोना काळात प्रामुख्याने वाढला होता. या काळात कंपनीने प्रंचड मोठ्या प्रमाणावर करचुकवेगिरी केली. या काळात कंपनीने सुमारे 50 कोटी टॅबलेट्सची विक्री केली. या विक्रीतून सुमारे 400 कोटी रुपयांचा महसूल कमावला. मात्र, त्या तुलनेत आवश्यक कर मात्र भरला नाही. कोरोना काळात खास करुन पॅरासिटॅमॉल टॅबलेट्सला पर्याय म्हणून Dolo-650 टॅबलेट्स वापरल्या गेल्या. या काळात या टॅबलेट्सची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली. सोशल मीडियावरही त्याची मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले.