विद्यमान आठवड्यात पूर्व आणि मध्य भारतात पावसाचा जोर वाढेल, असा हवामान अंदाज (IMD Weather Forecast India) आयएमडी म्हणजेच भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने त्याचा परिणाम लगतच्या पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळेल. शिवाय पुढील 2-3 दिवसांत, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस () पडण्याची शक्यता आहे. उद्याचे हवामान (Forecast For Tomorrow) काहीसे ढगाळ आणि काही ठिकाणी पावसासाठी पूरक असल्याचे सांगतानाच आयएमडीने उत्तर प्रदेशसह उत्तर-पश्चिमी राज्येही हाय अलर्टवर असल्याचे म्हटले आहे. प्रामुख्याने या राज्यांमध्ये पुढील 5 ते 7 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, दिल्ली-एनसीआर प्रदेशात हलक्या पावसाचा अंदाज येऊ शकतो, ज्यामुळे सध्याच्या आर्द्रतेपासून थोडासा दिलासा मिळेल, असा हवामान अंदाज वर्तविण्यात आला आहे.
जम्मू आणि काश्मीर, लडाख, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हा आठवडा काहीसा अनिश्चित मान्सून पावसाचा असू शकतो. याचा अर्थ असा की, या राज्यांमध्ये अचानक मुसळधार पाऊस कोसळू शकतो. याव्यतिरिक्त, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये लक्षणीय पाऊस अपेक्षित आहे. (हेही वाचा, Hare Care Tips For Monsoon: पावसाळ्यात कशी घ्यावी केसांची काळजी? जाणून घ्या खास टिप्स)
दिल्लीचे आजचे हवामान
दिल्लीत सोमवारी हलका पाऊस किंवा रिमझिम पावसासह ढगाळ आकाश राहण्याचा हवामान अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. IMD च्या अंदाजानुसार कमाल तापमान 35 डिग्री सेल्सिअसच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान सुमारे 27 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Monsoon Health Tips for Kids: पावसाळ्यात मुले निरोगी राहतील, 'घ्या' अशी काळजी)
ईशान्येकडील राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी
IMD ने पश्चिम बंगाल, नागालँड, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सक्रिय मान्सून आणि तीव्र होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम बंगालमध्ये 20 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा आहे, जो पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची अपेक्षा आहे.
एक्स पोस्ट
— RWFC New Delhi (@RWFC_ND) August 18, 2024
दरम्यान, महाराष्ट्रात पावसाने बऱ्यापैकी उगडीप दिली आहे. नाही म्हणायला पावसाच्या तुरळक सरी बरसत आहेत. मात्र, असे असे असले तरी वातावरण कोरडे आणि आकाशही निरभ्र असल्याचे पाहायला मिळत आहे. वातावरण कोरडे असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. तसेच, उकाडाही जाणवू लागला आहे. पाऊस पडत नसला तरी पावसाळा ऋतू सुरु असतानाही जाणवण्याइतपत उकाडा आणि उन्हाच्या झळा यांमुळे नागरिक हैराण असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या पावसामुळे हिरवा चारा निर्माण झाला असला तरी, तीव्र उन्हामुळे तो सुखू लागल्याने जणावरांच्या चाऱ्याचे काय करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.