पत्नीने शरीरसंबंधास (Sex) नकार दिल्याने पतीने पत्नीची हत्या केली आहे. जटावथ तरुण असे आरोपीचे नाव आहे. तो 24 वर्षांचा आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने गुन्हा कबलू केला असून आपण पत्नी झाशी (वय 20) हिची सेक्सला नकार दिल्याने गळा आवळून हत्या केल्याचे म्हटले आहे. पोलिसांना सुरुवातीला झाशी हिच्या मृत्यूचे कारण लक्षातयेत नव्हते. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तिचा मृत्यू गळा आवळ्याने श्वास कोढून झाल्याचे म्हटले आहे. हा गुन्हा 20 मे रोजी रात्री घडला असला तरी पोलिसांना या प्रकरणाचा छडा 10 दिवसांनंतर लावता आला.
अधिक माहिती अशी की, तेलंगणातील नागरकुरनूल जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या जोडप्याने 2021 मध्ये प्रेमविवाह केला होता. तरुण, एक ऑटो रिक्षा चालक आहे. तो आपल्या पत्नीसह हैदराबादला स्थलांतरित झाला होता. त्याचे कुटुंब IS सदन विभागातील खाजा बाग येथे राहत होते. या दाम्पत्याला दोन वर्षांचा मुलगा आहे. तर नुकताच त्यांनी आणखी एका अपत्याला जन्म दिला आहे. पत्नी झाशी ही 16 एप्रिल रोजी दुसऱ्यांदा आई झाली. तिने एका मुलीला जन्म दिला. (हेही वाचा, Man kills Wife Over Sex: पत्नीने सेक्स करण्यास दिला नकार; पतीने गळा दाबून केली हत्या, महिन्याभरापूर्वी दिला होता दुसऱ्या बाळाला जन्म)
ट्विट
Enraged over his wife refusing sex, a man strangled her to death in #Hyderabad. pic.twitter.com/2lZgpAF8gF
— IANS (@ians_india) June 1, 2023
आरोपीने पोलिसांना सांगितले की, ही घटना घडली तेव्हा 20 मेच्या रात्री त्याने पत्नीकडे आपली संभोग करण्याची इच्छा व्यक्त केली. झाशीने त्याला सांगितले की ती खूप थकली आहे. मात्र, त्या व्यक्तीने तिच्यावर जबरदस्ती सुरू केली. तिने आरडाओरडा सुरू केल्यावर त्याने हाताने तिचे तोंड दाबले. काही काळ त्याने तिचे तोंड आणि नाक हाताने अडवले, त्यामुळे हवेचा पुरवठा खंडित झाला. ती गतिहीन झाली आणि तोंडाला फेस येऊ लागल्याने तरुण घाबरला आणि त्याने नातेवाईकांना कळवले. तिला तातडीने ओवेसी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.