Man kills Wife Over Sex: पत्नीने सेक्स करण्यास दिला नकार; पतीने गळा दाबून केली हत्या, महिन्याभरापूर्वी दिला होता दुसऱ्या बाळाला जन्म
Death | Representational Image (Photo Credits: Pixabay)

तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये (Hyderabad) सेक्स (Sex) करण्यास नकार दिल्याने तरुणाने पत्नीची हत्या केली आहे. ही घटना 20 मे रोजी घडली मात्र आता ती उघडकीस आली आहे. आरोपी पतीने आपला गुन्हा मान्य केला आहे. या घटनेमुळे दोन निष्पाप मुलांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरवले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे वय अंदाजे 25 वर्षे आहे. त्याने पत्नीकडे सेक्सची मागणी केली होती. मात्र महिनाभरापूर्वीच त्याच्या पत्नीने दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता व त्यामुळे ती संबंध ठेवायला तयार नव्हती.

तिला सेक्स करायचा नव्हता व तिने पतीला सांगितले की, ती सध्या संबंध ठेवण्याच्या स्थितीत नाही. यामुळे आरोपी संतप्त झाला. यावरून त्याने पत्नीशी भांडण सुरू केले. या भांडणामध्ये त्याने पत्नीचा गळा आवळून खून केला. यानंतर त्याने पत्नीच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.

याची माहिती मिळताच महिलेचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. त्यांची मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे त्यांनी पाहिले. घरात ठेवलेल्या वस्तू इकडे तिकडे विखुरल्या होत्या. त्यावरून नवरा-बायकोमध्ये मोठे भांडण झाले असल्याचे लक्षात आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी महिलेला रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (हेही वाचा: टीडी कॉलेजच्या प्राध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थ्यावर केले लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल, आरोपीला अटक)

गळा दाबत असताना आरोपीची नखे मृत महिलेच्या गळ्यात घुसली होती. तपासादरम्यान तिच्या मानेवर नखाच्या खुणा आढळून आल्या. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची कसून चौकशी केली. सय्यदाबाद पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. शवविच्छेदन अहवालातही मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याआधीही आरोपीने आपल्या पत्नीवर अत्याचार केल्याचा आरोप नातेवाईकांनी तक्रारीत केला आहे.