यंदा 10 मार्चला होळाष्टक लागेल तर, 18 मार्चला होळी साजरी केली जाणार आहे. यावर्षी शुक्रवारी होळी येत आहे, त्यामुळे पुढील दोन दिवस वीकेंडचे असल्याने तुम्ही या सणाचा मनोसोक्त आनंद घेऊ शकाल. होळीच्या सणादरम्यान प्रवासाची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून प्रवाशांच्या सोयीसाठी, पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल-जयपूर-बोरिवली, वांद्रे टर्मिनस-भगत की कोठी-बोरिवली आणि वांद्रे टर्मिनस-भावनगर-वांद्रे टर्मिनस दरम्यान विशेष शुल्कासह होळी स्पेशल सुपरफास्ट ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्र. 09039/09040 मुंबई सेंट्रल - जयपूर - बोरिवली सुपरफास्ट
गाडी क्र. 09039 मुंबई सेंट्रल - जयपूर सुपरफास्ट स्पेशल बुधवार, 16 मार्च 2022 रोजी मुंबई सेंट्रल येथून 23.55 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 19.25 वाजता जयपूरला पोहोचेल.
त्याचप्रमाणे ट्रेन क्र. 09040 जयपूर - बोरिवली सुपरफास्ट स्पेशल जयपूर येथून गुरुवार, 17 मार्च 2022 रोजी 21.15 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी 15.10 वाजता बोरिवलीला पोहोचेल.
ही गाडी दोन्ही दिशांना बोरिवली, वापी, सुरत, भरूच, वडोदरा, अहमदाबाद, महेसाणा, पालनपूर, अबू रोड, फलना, मारवाड जंक्शन, बेवार, अजमेर, किशनगड आणि फुलेरा स्थानकावर थांबेल.
या ट्रेनमध्ये Ist AC, AC 2-Tier आणि AC 3-Tier डब्यांचा समावेश आहे.
गाडी क्र. 09035/09036 वांद्रे टर्मिनस - भगत की कोठी - बोरिवली सुपरफास्ट
गाडी क्र. 09035 वांद्रे टर्मिनस - भगत की कोठी सुपरफास्ट स्पेशल बुधवार, 16 मार्च 2022 रोजी वांद्रे टर्मिनस येथून सकाळी 11.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04.00 वाजता भगत की कोठी येथे पोहोचेल.
ट्रेन क्र. 09036 भगत की कोठी - बोरिवली सुपरफास्ट स्पेशल गुरुवार, 17 मार्च 2022 रोजी भगत की कोठी येथून सकाळी 11.40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04.15 वाजता बोरिवलीला पोहोचेल.
ही गाडी दोन्ही दिशांना बोरिवली, वापी, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, महेसाणा, पाटण, भिलडी, रानीवारा, मारवाड भीनमाळ, मोदरन, जालोर, मोकलसर, समदरी आणि लुनी स्थानकांवर थांबेल.
या ट्रेनमध्ये एसी 2-टायर, एसी 3-टायर, स्लीपर क्लास आणि सेकंड क्लास सीटिंग डब्यांचा समावेश आहे.
गाडी क्र. 09005/09006 वांद्रे टर्मिनस - भावनगर टर्मिनस - वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट
गाडी क्र. 09005 वांद्रे टर्मिनस - भावनगर टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल सोमवार, 14 मार्च 2022 रोजी वांद्रे टर्मिनस येथून 21.45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 10.30 वाजता भावनगर टर्मिनसला पोहोचेल.
ट्रेन क्र. 09006 भावनगर टर्मिनस - वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल भावनगर टर्मिनस वरून बुधवार, 16 मार्च 2022 रोजी सकाळी 10.10 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 23.25 वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल.
ही गाडी दोन्ही दिशांना बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, अहमदाबाद, बोटाड, ढोला, सोनगढ आणि सिहोर जंक्शन स्थानकावर थांबेल.
या ट्रेनमध्ये एसी 2-टायर, एसी 3-टायर, स्लीपर क्लास आणि सेकंड क्लास सीटिंग डब्यांचा समावेश आहे. (हेही वाचा: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; रस्ते अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार 2 लाखांची भरपाई)
ट्रेन क्रमांक 09039, 09035, 09005 आणि 09006 चे बुकिंग 2 मार्च 2022 पासून PRS काउंटर आणि IRCTC वेबसाइटवर सुरू होईल. वरील ट्रेन विशेष शुल्कासह पूर्णपणे आरक्षित विशेष ट्रेन म्हणून धावतील.