पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्तुती; जाणून घ्या त्यामागचं कारण
PM Narendra Modi (Photo Credits: ANI)

भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने महाराष्ट्रात त्यांची साथ सोडली आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांशी हात मिळवणी केली. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र आज राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्तुती केली (Prime Minister Narendra Modi appreciates NCP). निषेध नोंदवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजेडी या दोन्ही पक्षांनी कधीही पातळी सोडली नाही असं म्हणत त्यांनी या पक्षांची वाहवाह केली.

एएनआई ने केलेल्या ट्विटनुसार मोदी म्हणाले, "आज मला राष्ट्रवादी आणि बीजेडी या दोन पक्षांचे कौतुक करावेसे वाटते. या पक्षांनी संसदीय निकषांचे काटेकोरपणे पालन केले आहे. त्यांनी कधीही त्यांची पातळी सोडली नाही. तरीही त्यांनी आपले मुद्दे अतिशय प्रभावीपणे मांडले आहेत. माझ्यासह इतर पक्षांनी त्यांच्याकडून शिकायला हवे."

पाहा ट्विट,

इतकंच नव्हे तर, मोदी असंही म्हणाले की, "आपल्या देशात एक मोठा कालखंड होता, जेव्हा विरोधी पक्षाकडून फारशी दमदार कामगिरी होत नसत. त्यावेळी सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना त्याचा मोठा फायदा झाला. पण त्याही वेळी सदनात असे अनुभवी लोक होते, ज्यांनी शासन व्यवस्थेत कधी हुकूमशाही येऊ दिली नाही. हे आपल्या सर्वांसाठी संस्मरणीय आहे."

राज्यसभेच्या 250 व्या सत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे

दरम्यान संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या दिवशी राज्यसभेला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कौतुक केलं आहे.