Unseasonal Rain in Pune | (Photo Credit - X)

Unseasonal Rain in Pune: पाठिमागील काही दिवसांपासून उन्हाने हैराण आणि उकाड्याने कासावीस झालेल्या पुणेकरांना अवकाळी पावसाने आज दिलासा दिला. गुरुवारी (9 मे) दुपारच्या सुमारास अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पुणे शहर आणि परिसरात कोसळला. त्यामुळे तापलेल्या वातावरणातील दाह कमी होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला. आयएमडीने येत्या काही दिवसात पावसाच्या सरी कोसळतील असा हवामान अंदाज (Weather Forecast) यापूर्वीच व्यक्त केला होता. उन्हाळा मी म्हणत असताना आलेला हा पाऊस नागरिकांसाठी वाढत्या तापमानापासून सुटका देणारा ठरला आहे.

पुणे शहरातील तापमान चढे

पुणे शहरातील तापमान पाठीमागील काही दिवसांपासून सातत्याने चढे राहिले होते. पाठिमागच्या दोन दिवसांचा विचार करता तापमाना 41 सेल्सअसपर्यंत पोहोचले होते. परिणामी वातावरणातील उष्मा वाढला होता. नागरिक उाकाड्याने हैराण झाले होते. अंगाची लाहीलाही होत होती. त्यात दुपारची वेळ (1 ते 4) म्हणजे पुणेकरांच्या विश्रांतीची वेळ. या वेळेत पुणेकर विश्रांती घेण्यापेक्षा उकाडा आणि उन्हाच्या झळांनीच अधिक त्रस्त झाले होते. अशा वेळी अवकाळी पाऊस आला आणि त्याने दमदार हजेरी लावली आणि एका फटक्यात वातावरणात चांगलाच गारवा निर्माण केला. (हेही वाचा, Maharashtra Weather: कोकणात उष्णतेची लाट, मराठवाड्यासह विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज)

एक्स पोस्ट

व्हिडिओ

पुणे जिल्ह्यातील काही भाग पावसाने झोडपला

आयएमडीने हवामान अंदाज वर्तवताना पुणे शहरात पाऊस कोसळेल असे म्हटले होते. त्यानुसार पावसाने हजेरी लावलीसुद्धा. अचानक आलेल्या पावसाने शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचले. काही काळ वाहतूक कोंडीही पाहायला मिळाली. खास करुन नांदेड सिटी परिसरात रस्त्यांवर पाणी साचले. पुणे जिल्ह्यातील इतर भागांतही दमदार पावसाने हजेरी लावली. शिरुर,आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यातील अनेक भाग पावसाने अक्षरश: झोडपून काढला. अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा आणि तापमानात काहीशी घट झाली असली तरी, शेतकऱ्यांना मात्र तितका फायदा झाला नाही. काढणीला आलेला उन्हाळी कांदा आणि फळबागांना या पावसाचा मोठा फटका बसू शकतो. (हेही वाचा :Maharashtra Weather : राज्यात येत्या 48 तासांत तापमान 2 ते 4 अंशांनी वाढण्याची शक्यता; सोलापुरात सर्वाधीक तापमानाची नोंद, पारा 39 अंशांवर)

व्हिडिओ

अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ

दरम्यान, केवळ पुणेच नव्हे तर राज्यातील इतर भागांतही पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे. खास करुन हिंगोली जिल्ह्यात पावसाने आज दुपारी हजेरी लावली. ज्यामुने नागरिकांची तारांबळ उडाली. मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर दुकान मांडलेल्या दुकानदारांची तर चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. अनेक दुकानदारांचा माल पावसाने भिजला. तर इमारतीमध्ये दुकान असलेल्या दुकानदारांनाही दुकानासमोरील माल आत घेताना पावसाच्या शिडकावाचा सामना करावा लागला. शाळेला सुट्टी लागल्याने बच्चे कंपनीने मात्र पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतला. तर उन्हाच्या धगीने तापललेल्या राणांना पाण्याचा स्पर्श झाल्याने धरीत्रीलाही गारवा लाभला.