इंडिगोच्या (Indigo Flight) जोधपूर ते जयपूरच्या फ्लाइटमध्ये प्रवाशांनी हेव्ही टर्ब्युलन्सचा (Air Turbulence) अनुभव घेतला. हा अनुभव इतका भयावह होता की, फ्लाइटमधील सर्वच प्रवासी ढसाढसा रडत होते. सर्वांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. ही घटना इंडिगोच्या जोधपूर ते जयपूर फ्लाइट 6E-7406 शी संबंधित आहे. खराब हवामानामुळे इंडिगोच्या जोधपूर ते जयपूर फ्लाइट 6E-7406 फ्लाइटचं लँडिंग करण्याच मोठी अडचण आली. अशा परिस्थितीत विमान तब्बल 30 मिनिटांसाठी आभाळात घिरट्या घालत होतं. तर विमानात बसलेले प्रवासी चांगलेच घाबरल्याचं पाहायला मिळालं. (हेही वाचा - Indigo Bomb Threat: इंडिगोच्या चेन्नई-मुंबई विमानात बॉम्बची धमकी, विमानाचे इमर्जन्सी मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग; सर्व 172 प्रवासी सुरक्षित)
इंडिगोच्या फ्लाइटमधील प्रवाशांनी हादरवणाऱ्या टर्ब्युलन्सचा अनुभव घेतला. एवढ्या हेव्ही टर्ब्युलन्समुळे फ्लाइटमधील ऑक्सिजनच्या बॅग्सही उघडल्या. तब्बल 30 मिनिटांसाठी विमान आकाशात घिरट्या घालत होतं. विमानात गोंधळ झाल्यानं प्रवासी घाबरले. खराब हवामानामुळे काही प्रवासी रडायला लागले. फ्लाइटमध्ये उपस्थित असलेल्या प्रवाशांनी दावा केला की, त्यांनी विमानात असा गोंधळ यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. तर अशा टर्ब्युलन्सचा अनुभव यापूर्वी कधीही घेतला नव्हता.
इंडिगो फ्लाइट 6E-7406 जोधपूरहून सकाळी 11:05 वाजता उड्डाण करणार होती आणि 1 तास 15 मिनिटांनी 12:20 वाजता जयपूरला पोहोचणार होती. पण, खराब हवामानामुळे विमानानं जोधपूरहून दुपारी 12.02 मिनिटांनी उड्डाण घेतलं. तर दुपारी 1:42 वाजता विमान जयपूर विमानतळावर उतरलं. यावेळी विमान जयपूरमध्ये तब्बल 25 मिनिटं आकाशात घिरट्या घालत होतं.