IndiGo | (Photo credit: archived, edited, representative image)

Indigo Bomb Threat: चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या 6 E 5314 या फ्लाइटला शनिवारी बॉम्बने उडवून देण्याची धमकी (Indigo Bomb Threat) मिळाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. यानंतर विमानाचे मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing) करावे लागले. इंडिगोने याबाबत निवेदन जारी केले असून त्यानुसार सर्व 172 प्रवासी विमानातून सुखरूप उतरले आहेत. विमानाची अद्याप चौकशी सुरू आहे. सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर विमान टर्मिनल परिसरात परत नेले जाईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 8.45 च्या सुमारास विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आणि सर्व प्रवासी खाली उतरले. गेल्या एका आठवड्यात इंडिगो फ्लाइटशी संबंधित अशी ही दुसरी घटना आहे. 28 मे रोजी, दिल्ली ते वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटमध्ये बॉम्बची धमकी मिळाली होती. (हेही वाचा -Bomb Threat Call Targeting Vistara Flight: दिल्लीहून येणाऱ्या विस्तारा फ्लाइट UK611 ला बॉम्बने उडवण्याची धमकी)

इंडिगोने जारी केले निवेदन -

चेन्नई-मुंबई फ्लाइटवर कथित बॉम्बच्या धोक्याची पुष्टी करताना, इंडिगोने एका निवेदनात म्हटले आहे की, 'मुंबईत उतरल्यावर क्रूने प्रोटोकॉलचे पालन केले आणि सुरक्षा एजन्सीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विमानाला आयसोलेशन बेमध्ये नेले. सर्व प्रवासी सुरक्षितपणे विमानातून उतरले असून, सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर विमान टर्मिनल परिसरात परत नेण्यात येईल.