Hidden Camera Found Girls' Washroom | (Photo Credit X)

आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh news) कृष्णा जिल्ह्यातील (Krishna District) गुडलावल्लेरू अभियांत्रिकी महाविद्यालयात (Gudlavalleru College of Engineering) मुलींच्या वसतिगृहाच्या वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा (Hidden Camera Found Girls' Hostel Washroom) आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. संतप्त विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणावर निदर्शने (Student Protests) केली. धक्कादायक घटनेचा एक व्हिडिओ कथीतरित्या विद्यार्थ्यांमध्ये सोशल मीडियातून व्हायरल झाला. ज्यामुळे कॅम्पसमध्ये आणखी तणाव वाढला असून, प्रशासन आणि पोलिसांकडून विद्यार्थ्यांना शांततेचे अवाहन करण्यात आल्याचे समजते.

विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट

गुडलावल्लेरू अभियांत्रिकी महाविद्यालयात वसतिगृहाच्या वॉशरुममध्ये छुपा कॅमेरा असल्याचे एका मुलीला आढळून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली. घडलेली घटना समजताच विद्यार्थ्यांनी गुरुवारी रात्री मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली. घडल्या प्रकारामुळे महाविद्यालयातील सुरक्षितता आणि गोपनीयतेबद्दल गंभीर चिंता निर्माण होत आहेत. संतप्त विद्यार्थ्यांनी त्वरित कारवाई आणि न्यायाची मागणी केली आहे. (हेही वाचा, Vasai Student Molestation: चुकीचा स्पर्श, जबरदस्ती चुंबन, वसई येथे 14 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकास ग्रामस्थांचा चोप; पोलिसांकडून अटक)

व्हिडिओ व्हायरल झाल्याचा दावा

प्ररसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, छुप्या कॅमेऱ्याने रेकॉर्ड केलेले काही व्हिडिओ कथितपणे मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये सामायिक केले गेले. ज्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली. घटनेची माहिती पसरताच, विद्यार्थी कॅम्पसमध्ये जमा झाले, त्यांनी रात्रभर निदर्शने केली आणि जबाबदारीची निश्चित करण्याची मागणी केली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस इंजिनीअरिंग कॉलेज कॅम्पसमध्ये दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. गुप्त कॅमेऱ्याच्या संदर्भात अंतिम वर्षाच्या एका विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणात अद्याप तरी कोणाला अटक करण्यात आली नाही. या घटनेशी संबंधित सर्व व्यक्तींना अटक करून त्यांना जबाबदार धरण्यात यावे, अशी पीडित विद्यार्थ्यांची मागणी आहे. (हेही वाचा,  (हेही वाचा, Nashik Tuition Teacher Molested Minor Girl: नाशिकमध्ये 32 वर्षीय ट्यूशन शिक्षकाकडून पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग; गुन्हा दाखल) )

विद्यार्थ्यांची जोरदार निदर्शने (Video)

आंध्र प्रदेश सरकारच्या प्रतिक्रियेची प्रतिक्षा

दरम्यान, अतिशय संवेदनशील घटना असूनही आंध्र प्रदेश सरकारकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आली नसल्याचे प्रसारमाध्यमांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे. राज्य सरकारच्या प्रतिक्रियेची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. मानव संसाधन विकास मंत्रालय आणि जिल्हा प्रशासनाकडूनही अद्याप कोणत्याही प्रकारचे अधिकृत निवेदन अथवा स्पष्टीकरण आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या निषेधाचे व्हिडिओ आणि कथित व्हॉट्सॲप चॅटचे स्क्रीनशॉट, विद्यार्थ्यांमध्ये देवाणघेवाण केली जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यातील काही भाग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिवाय, विद्यार्थ्यांच्या खोल्यांमध्ये चौकशीसाठी प्रवेश करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे फुटेजही प्रसारित केले जात आहे. महाविद्यालयीन समुदाय पुढील घडामोडींच्या प्रतीक्षेत असल्याने परिस्थिती तणावपूर्ण आहे. (हेही वाचा, Nandurbar: अल्पवयीन मुलीस मबाईलवर दाखवला Pornographic Content, नंदूरबार येथील धक्कादायक प्रकार, एकास अटक)

मणीपूर, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रानंतर आता आंध्र प्रदेशही महिलांवरील लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि गैरवर्तनांच्या घटनेमुळे चर्चेत आले आहे.