Molestation | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Vasai Class Teacher Molested Minor Girl: प्राप्त माहितीनुसार, या शिक्षकाकडून शिकवणी घ्यायला जाण्यास पीडित मुलीने एके दिवशी नकार दिला आणि ती गैरहजर राहिली. मुलगी शिकवणीस गेली नसल्याने पालकांनी तिच्याकडे चौकशी केली असता, हा धक्कादायक प्रकार पुढे आला. त्यानंतर पालिकांनी शिक्षकाकडे जाब विचारला. तसेच, स्थानिक नागरिकांनी त्याला रस्त्यावर विवस्त्र करुन चोप दिल्याची प्राथमिक माहिती आहे. ग्रामस्थच पुढे या शिक्षकाला पोलिसांकडे घेऊन गेले आणि त्याला त्यांच्या स्वाधीन केले.

चुकीचा स्पर्श, जबरदस्ती चुंबन

पालकांनी शिवणीस जाण्यास नकार देण्याचे कारण विचारले असता पीडितेने सांगितले की, सदर शिक्षक तिच्याशी असभ्य वर्तन करतो. आपण नकार दिला असतानाही त्याने आपले चुंबन घेतले. शिवाय, आपल्या मनात लज्जा उत्पन्न होईल, अशा चुकीच्या प्रकारे त्याने आपणास स्पर्शही केला. पीडितेने सांगितलेला प्रकार लक्षात येताच पालक प्रचंड सांतपाले. त्यांनी स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन विनयभंग करणाऱ्या संशयित शिक्षकाचे वसई येथील ठिकाण शोधले आणि त्याला जाब विचारला. वयवर्षे 35 असलेल्या या तरुण शिक्षकास जाब विचारताना पालकांचे संतापाच्या भरात स्वत: वरील नियंत्रण सुटले आणि त्यांनी त्यास माराहण सुरु केली. (हेही वाचा, Nashik Tuition Teacher Molested Minor Girl: नाशिकमध्ये 32 वर्षीय ट्यूशन शिक्षकाकडून पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग; गुन्हा दाखल)

शिक्षकास विवस्त्र करुन चोप

पालकांनी सदर शिक्षकास खेचत रस्त्यावर आणले आणि त्याल विवस्त्र करुन चोप दिला. यामध्ये महिलांचाही समावेश असल्याचे समजते. महिलांनी या शिक्षकास चपलेने झोडपले. घटनास्थळावरच त्याला इतका मार मिळाला की, त्याचा चेहरा आणि शरीर काळेनिळे पडले होते. दरम्यान, पोलिसांनी तातडीने घटनेची नोंद घेऊन गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यान्वये विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा, Karnataka Crime: इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात ! 21 वर्षीय महिलेचे अपहरण करून बलात्कार, दोन जणांना अटक)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने आपल्या जबाबात नमूद केले आहे की, शिक्षक तिचा शारीरिक छळ करत होता. त्याने तिचे जबरदस्तीने चुंबनही घेतले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, क्लासमध्ये सीसीटीव्ही नाही. आरोपी आणि पीडिता एकाच परिसरात राहतात. लवकरच क्लासमधील इतर विद्यार्थ्यांचाही जबाब नोंदवला जाणार आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी पोलीस स्टेशनबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. संतापलेल्या नागरिकांना शांततेचे अवाहन करताना पोलिसांनी कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे अवाहन केले. आरोपी शिक्षकावर विनयभंगाचा POCSO कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.