Karnataka Crime: कर्नाटक राज्यातील उड्डपी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २१ वर्षीय महिलेचे अपहरण (Kidnapping) करून तिच्यावर बलात्कार (Rape) करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना करकला शहरात घडली आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आरोपी आणि पीडितीचे ओळख झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कायद्यानुसार या प्रकरणाची पुढील कारवाई सुरू केली जात आहे. (हेही वाचा-अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीचा तलावात बुडून मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित आणि आरोपीची काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवरून ओळख झाली. मित्र म्हणून दोघेही एकमेंकाशी बोलू लागले. परंतु शनिवारी सकाळी त्याच मित्राने पीडितेवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले. शुक्रवारी दुपारी आरोपीने महिलेला एका निर्जनस्थळी बोलावून घेतले होते. त्याच ठिकाणाहून महिलेचा अपहरण करण्यात आले. तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
सामुहिक बलात्कार झाल्याचा आरोप
या घटनेनंतर एक वेगळीच कलाटणी घेतली आहे. हिंदू संघटनांनी पीडितेवर सामुहिक बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पीडित महिलेले पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे, मात्र, पोलिसांनी सामुहिक बलात्कार झाल्याची शक्यता फेटाळली आहे.
उ़डप्पीचे एसपी डॉ. अरुण कुमार यांनी सांगतिले की, शुक्रवारी मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे अपहरण करुन बलात्कार करण्यात आले. पीडित आणि आरोपी गेल्या तीन महिन्यांपासून इंस्टाग्रामवर मित्र होते. पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अल्ताफ आणि सवेरा रिचर्ड करडोसा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.