Nandurbar Crime News: . या घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला असून, आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. पीडितेच्या कुंटुंबाने दिलेल्या तक्रारीवरुन आम्ही बीएनएस आणि पोक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. या प्रकरणात एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे का, याबाबत तपास सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पालकांकडून तक्रार, पोलिसांकडून गुन्हा दा
नंदुरबारचे एसपी श्रावण दत्त यांनी माहिती देताना सांगितले की, नंदुरबारमधील एका शाळेत ही घटना 27 ऑगस्ट रोजी घडली. शाळेत काम करणाऱ्या एका व्यक्तीने एका अल्पवयीन शाळकरी मुलीला त्याच्या फोनवर अश्लील सामग्री दाखवल्याचा आरोप आहे. संशयीत आरोपीच्या कथीत कृत्याबद्दल मुलीच्या पालकांना माहिती मिळताच त्यांनी पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली. (हेही वाचा, Dindoshi Rape Case: 30 वर्षीय बापाचा पोटच्या 9 वर्षीय मुलीवर बलात्कार; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल)
संशयित आरोपीस अटक
पुढे बोलताना श्रवण दत्त यांनी सांगितले की, घटनेची माहिती आणि तक्रार प्राप्त होताच आम्ही तातडीने कारवाई केली. संशयीत आरोपी विरोधात नंदुरबार शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्यानुसार एफआयआर दाखल केला आहे. एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. आम्ही लवकरच त्याच्यावर आरोपपत्र दाखल करणार आहोत. दरम्यान, हे कृत्य आरोपीने एकट्यानेच केले आहे की, त्याला आणखी कोणाची सोबत होती, याबाबत आम्ही चौकशी करत असल्याचेही पोलीस अधिकारी श्रावण दत्त म्हणाले. (हेही वाचा, Thane Daily Pocso Cases: धक्कादायक! ठाणे जिल्ह्यात प्रतिदिन एका पॉक्सो कायदा प्रकरणाची नोंद, एकट्या कल्याणमध्येच 25% पेक्षा अधिक घटना; वर्षभरातील आकडेवारी)
नंदूरबार पोलिसांकडून कारवाईबाबत तातडीने माहिती (Video)
#WATCH | Maharashtra: Nandurbar SP Shravan Dutt says, "On 27th August, an incident occurred in a school in Nandurbar. A man working in the school showed pornographic content on his phone to a minor schoolgirl. Today, the victim's family reached the Police Station and taking… pic.twitter.com/cJiEKjFhZp
— ANI (@ANI) August 29, 2024
अल्पवयीनांच्या लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ
शाळा आणि शालेय आवारात विद्यार्थी असलेल्या मुले आणि मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना पाठिमागील काही दिवसांपासून सातत्याने पुढे येत आहेत. घटनांचा तपशील आणि त्याचा प्रकार पाहता प्रकरणांचा केवळ भांडाफोड झाल्यावरच त्या घटना पुढे येतात. दरम्यान, पुढे न आलेल्या घटनांची संख्याही मोठी असू शकते, अशी भावना सामान्य नागरिकांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. दुसऱ्या बाजूला, सुरक्षीत समजल्या जाणाऱ्या नामांकित शाळांमध्येही असे प्रकार घडत असल्याने सामान्य शाळांमध्ये काय घडत असेल? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. या घटनांमुळे पालक विचलित झाले असून, त्यांना आपल्या मुलांची काळजी वाटू लागल्याने ते चिंतीत झाले आहेत. अलिकडेच बदलापूर येथील घटनेवरुन मोठ्या प्रमाणावर प्रक्षोभ निर्माण झाला. त्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले असून, शाळांना आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.