Greta Thunberg Toolkit Document Case: 'टूलकिट' प्रकरणात दिल्ली पोलिसांनी लिहिले Zoom App ला पत्र; मागितली 11 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीची माहिती
Photo Credits: Wikimedia Commons and Facebook)

26 जानेवारीला राष्ट्रीय राजधानीत झालेल्या हिंसाचारानंतर समोर आलेल्या 'टूलकिट' प्रकरणात (Toolkit Document Case) नवनवीन खुलासे होत आहेत. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी त्यांचा तपास वेग वाढविला आहे. आता दिल्ली पोलिसांनी झूमला (Zoom) पत्र लिहून 26 जानेवारीच्या हिंसाचार प्रकरणातील झूमवरील ‘टूलकिट’ विषयीच्या बैठकीची माहिती मागितली आहे. झूमला लिहिलेल्या पत्रात दिल्ली पोलिसांनी झूमच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीमध्ये कोण कोण सहभाग होते याची माहिती विचारली आहे. असे दिसून आले आहे की फक्त 11 जानेवारीच नव्हे, तर 22 जानेवारीलाही झूम प्लॅटफॉर्मवर एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शेतकरी आंदोलन मोठे करण्याच्या आडून ते भडकावण्याची योजना तयार केली गेली.

26 जानेवारी रोजी दिल्लीतील हिंसाचाराचा कट किती मोठा होता, हे टूलकिटच्या चौकशीत सायबर सेलने उघड केले आहे. सोमवारी, सायबर सेलने 11 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या आधी झूम बैठक आयोजित केल्याचे उघड केले. या बैठकीला एमओ धालीवाल, निकिता आणि दिशा व्यतिरिक्त सुमारे 70 जण उपस्थित होते. एमओ धालीवाल म्हणाली की, हा मुद्दा मोठा करायला हवा. शेतकर्‍यांमध्ये असंतोष आणि चुकीची माहिती पसरवणे हे त्याचे उद्दीष्ट होते. 26 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारानंतर आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी आणि कार्यकर्त्यांशी संपर्क साधला गेला. दिशा ग्रेटाला ओळखत असल्याने तिची मदत घेण्यात आली.

आता अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांनी व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी वापरल्या जाणार्‍या ‘झूम’ अ‍ॅपला एक पत्र लिहिले असून, 11 जानेवारीला ऑनलाईन बैठकीस उपस्थित असलेल्या लोकांविषयी माहिती मागितली आहे. (हेही वाचा: Greta Thunberg Toolkit Document Case: 'टूलकिट' प्रकरणात दिल्ली पोलिसांनी लिहिले Zoom App ला पत्र; मागितली 11 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीची माहिती)

टूलकिट प्रकरणात दिशाला अटक करण्यात आली आहे. दिशाने एक व्हाट्सएप ग्रुप तयार केला होता, जो नंतर डिलीट केला गेला. या संपूर्ण कटात केवळ दिशाच नव्हे तर तिचे साथीदार निकिता आणि शांतनु हे देखील महत्त्वाची लिंक असल्याचा पोलिसांचा दावा आहे. पोएटीक जस्टिस फाउंडेशनच्या अजेंडावर हे लोक किसान आंदोलन आणि ट्रॅक्टर रॅलीच्या आडून सोशल मीडियावर आपली योजना चालवित होते. निकिता व्यवसायाने वकील असून शंतनू अभियंता आहेत. दोन्ही आरोपींविरूद्ध महत्त्वपूर्ण पुरावे सापडल्यानंतर पोलिसांनी वॉरंट बजावले आहे. सध्या दोघेही फरार आहेत.