Goldy Brar Detained: सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रार अखेर कॅलिफोर्नियामधून ताब्यात
Sidhu Mossewala Goldy Brar| PC: Instagram and Twitter/@GurpreetSSahota

गायक, राजकीय नेता सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) याच्या खूनाचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रार (Goldy Brar) याला अखेर अमेरिकेच्या कॅलिफॉर्निया मधून ताब्यात घेण्यात आलं आहे. भारताच्या Intelligence Agencies च्या सूत्रांच्या माहितीनुसार, गोल्डीला ताब्यात घेण्यात आले आहे. गोल्डी ब्रार याने पंजाबी गायक मुसेवाल्याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. अद्याप यावर कॅलिफॉर्नियाच्या सरकारकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

RAW, IB, Delhi Police Special Cell आणि Punjab Intelligence यांना मिळालेल्या माहितीनुसार मात्र कॅलिफॉर्नियामध्ये Goldie Brar आहे आणि तेथेच त्याला ताब्यातही घेण्यात आले आहे.

मुसेवालाची हत्या 29 मे दिवशी झाली होती. त्याच्या खूनाचे धागेदोरे गोल्डी ब्रार पर्यंत पोहचलेले आहेत. गोल्डी ब्रार हा Lawrence Bishnoi gang चा अ‍ॅक्टिव्ह सदस्य आहे.ब्रार हा गेल्या महिन्यात डेरा सच्चा सौदाच्या अनुयायाच्या हत्येचा मुख्य सूत्रधार आहे. बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान देखील त्याच्या निशाण्यावर आहे. त्याबाबतही माहिती पोलिसांनी देत सलमान खानच्या सुरक्षेमध्ये वाढ केली आहे. हे देखील नक्की वाचा: Salman Khan Threat Letter Case: सलमान खान, सलिम खान यांना धमकावण्याच्या प्रकरणामागील Bishnoi Gang च्या हेतूबद्दल पोलिसांचा खुलासा; पहा काय होतं कारण!

सतींदरजीत सिंग उर्फ ब्रार हा मूळचा पंजाबमधील श्री मुक्तसर साहिबचा रहिवासी असून तो 2017 मध्ये विद्यार्थी व्हिसावर कॅनडाला गेला होता. तो लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सक्रिय सदस्य आहे.