
भारतातील सोने दर (Gold Price Today) विक्रमी उंचीवर पोहोचला आहे. चांदी दरातही (Silver Price Today) लक्षवेधी वाढ पाहायला मिळाली. भारतीय सराफा बाजारातील विक्रीचे सर्व उच्चांक मोडीत काढत सोने दराने आज नवा विक्रम प्रस्थापित केला. सोने दरातील वाढ सातत्याने सुरुच राहिली आणि नव्या विक्रमास गवसणी घालत हा दर 10 ग्रॅम 90,440 रुपये इतक्या पातळीवर पोहोचला, असे इंडिया बुलियन असोसिएशनने म्हटले आहे. आर्थिक अनिश्चितता आणि मध्यवर्ती बँकेच्या वाढत्या खरेदीमुळे जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे ही वाढ झाली आहे. वाचकांच्या माहितीसाटी असे की, येथे दिलेले दर हे केवळ मूळ स्वरुपातील असतात. त्यात कोणत्याही प्रकारच्या कराचा समावेश नसतो. परिणामी स्थानिक पातळीवर जीएसटी, आणि इतर काही शुल्क लागल्याने त्यात वाढ संभवते. सोनेखरेदीपूर्वी नजिकच्या सराफा दुकानात आपणास अचूक किंमत कळू शकते.
भारतातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव (प्रति 10 ग्रॅम - 19 मार्च)
नवी दिल्ली: 90,590 रुपये
मुंबई: 90,440 रुपये
कोलकाता: 90,440 रुपये
बेंगळुरू: 90,440 रुपये
चेन्नई: 90,440 रुपये
जागतिक पातळीवरही सोने दराचा विक्रम
- आंतरराष्ट्रीय सोने बाजारात सोने दरात ऐतिहासिक वाढ झाली. या बाजारात सोन्याच्या किमती प्रति औंस $3,028 वर पोहोचल्या, असे जागतिक सुवर्ण परिषदेने म्हटले आहे. 14 मार्च रोजी सोन्याने पहिल्यांदाच प्रति औंस $3,000 चा टप्पा ओलांडला.
- विश्लेषकांनी या वाढीचे कारण मध्यवर्ती बँकेची मजबूत मागणी, चालू आर्थिक अस्थिरता आणि जागतिक व्यापार धोरणांमधील अनिश्चितता आहे. बाजारातील तज्ज्ञांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार शुल्कामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम होत असल्याचेही सांगितले.
- चांदीच्या बाजारात सोन्याच्या तेजीचा कल दिसून आला, 19 मार्च रोजी सकाळी 7.30 वाजता किमती प्रति किलो101,490 पर्यंत पोहोचल्या. अक्षय ऊर्जा तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात चांदीचा वापर वाढत असल्याने त्याची मागणी मजबूत राहिली आहे.
दरम्यान, जागतिक आर्थिक ट्रेंड आणि मध्यवर्ती बँकेच्या खरेदीमुळे सोन्याच्या किमती अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे. गुंतवणूकदारांना गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी बाजारातील हालचालींचा मागोवा घेण्याचा आणि तज्ञांचा सल्ला घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. वाढत्या औद्योगिक मागणीमुळे चांदीच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.