Uttar Pradesh Video Viral: 'जय श्री राम'चा नारा लावणाऱ्या विद्यार्थ्याला स्टेजवरून उतरवले, शिक्षकांच्या भुमिकेमुळे हिंदू संघटना संतापली; पाहा व्हिडिओ
Viral video

Uttar Pradesh Video Viral: उत्तर प्रदेशातील अभियांत्रिक महाविद्यालयातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कॉलेजमध्ये कार्यक्रमावेळी एका विद्यार्थ्याने स्टेजवर उभे राहून जय श्री रामचा नारा दिला. यानंतर तेथे उपस्थित महिला प्राध्यापकाने संतप्त होऊन विद्यार्थिनीला फटकारले. यानंतर महिला प्राध्यापिकेने विद्यार्थ्याला स्टेजवरून हटवले. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक संतापाची भुमिका घेत कंमेट करत आहे. हा व्हिडिओ एबीईएस इंजिनिअरिंग कॉलेजचा आहे. येथे इंडक्शनचा कार्यक्रम सुरू होता.

जय श्री राम म्हणाताच महिला प्राध्यापिकेने विद्यार्थिनीला खडसावले आणि विचारले की, तुम्हाला घोषणाबाजी करण्यासाठी हे व्यासपीठ दिले आहे का? तुम्ही जय श्री राम कसे बोललात? प्रत्युत्तरात विद्यार्थ्याने त्याला सांगितले की, विद्यार्थ्यांकडून आवाज येत आहेत, त्यानंतर मी उत्तर दिले. विद्यार्थिनीचे म्हणणे ऐकून महिला प्राध्यापक अधिकच संतापल्या. यानंतर त्यांना मंचावरून हटवले. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर क्रॉसिंग रिपब्लिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

 

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक हिंदू संघटनांनी आपला निषेध व्यक्त केला आहे. त्याचबरोबर महिला प्राध्यापिकेच्या निलंबनाची मागणीही त्यांनी केली आहे. मात्र, कॉलेज प्रशासनाकडून अद्याप कोणतेही निवेदन आलेले नाही.