Gennova Biopharmaceuticals COVID Vaccine: भारतीय बनावटीच्या पहिल्या mRNA Vaccine Trials ची Omicron च्या लाटेदरम्यान फेब्रुवारी 2022 पासून सुरूवात; सूत्रांची माहिती
Indian mRNA Vaccine | PC: ANI

भारतामध्ये पुन्हा कोरोना संकट वाढत असताना आता लसीकरणावर भर देण्याकडे प्रशासनाचे लक्ष आहे. देशात कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरणाला 1 वर्ष कालच (16 जानेवारी) पूर्ण झाले आहे. आता भारत स्वदेशी बनावटीचे पहिली Messenger mRNA vaccine च्या तयारीत आहे. ANIच्या वृत्तानुसार फेब्रुवारी मध्ये या लसीच्या ट्रायल्सला सुरूवात होणार आहे. पुण्याच्या Gennova Biopharmaceuticals कडून फेज 2 चा डाटा सादर करण्यात आला आहे. फेज 3 साठी उमेदवार निवडीचं काम देखील पूर्ण झालं आहे.

Drugs Controller General of India च्या Subject Expert Committee कडून लवकरच याचा डाटा रिव्ह्यू केला जाणार आहे. Gennova Biopharmaceuticals कडून ओमिक्रॉन व्हेरिएंट वर देखील mRNA vaccine विकसित करण्यात आली आहे. या लसीच्या प्रभावाची आणि प्रतिकारशक्तीची लवकरच मानवी चाचणी होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. सप्टेंबर 2021 मध्ये Gennova ने जारी केलेल्या प्रेस स्टेटमेंट मध्ये 'Drug Controller General of India ने फेज 2,3 साठीचा HGCO19 चा स्टडी प्रोटोकॉल मंजूर करण्यात आल्याचं सांगण्यात आले होते. ही लस मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात बनवण्यात आली आहे.

भारत सरकारच्या Central Drugs Standard Control Organisation कडे Gennova ने अंतरिम क्लिनिकल डाटा फेज 1 सादर केला आहे. Vaccine Subject Expert Committee ने त्याचा अभ्यास केला असुन HGCO19 ही लस सुरक्षित, रोगप्रतिकारशक्ती देणारी आणि सहन करण्याजोगी असल्याचं म्हटलं आहे. भारतामध्ये 10-15 ठिकाणी फेज 2 आणि 22-27 ठिकाणी फेज 3 या लसीचा अभ्यास करण्यात आला आहे.

Gennova ही लसीच्या अभ्यासासाठी DBT-ICMR clinical trial network वापरत आहे. mRNA vaccines ही त्या वर्गातील लस आहे ज्यात nucleic acid vaccines येतात. म्हणजेच अशा लसी बनवताना थेट विषाणू न वापरता त्याऐवजी आजाराला कारणीभूत विषाणूच्या genetic material चा वापर केला जातो. हे देखील नक्की वाचा: COVAXIN Booster Dose Trial चा अहवाल सकारात्मक; कोणत्याही गंभीर दुषपरिणामांशिवाय दीर्घ काळ सुरक्षित असल्याचा Bharat Biotech चा दावा .

भारतात सध्या वापरल्या जाणार्‍या कोवॅक्सिन लसीमध्ये अकार्यक्षम स्वरूपातील विषाणू वापरला गेला आहे तर कोविशिल्ड आणि स्फुटनिक व्ही या लसी व्हेक्टर वॅक्सिन आहेत. अमेरिकेची फायझर, मॉडर्ना या लसी mRNA vaccines आहेत पण त्या अद्यापही भारतामध्ये उपलब्ध नाहीत.