COVAXIN Booster Dose Trial चा अहवाल सकारात्मक; कोणत्याही गंभीर दुषपरिणामांशिवाय दीर्घ काळ सुरक्षित असल्याचा  Bharat Biotech चा दावा
Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

Covaxin कोविड 19 लसीची निर्मिती करणार्‍या भारत बायोटेक (Bharat Biotech) या कंपनीने नुकताच त्यांच्या बुस्टर डोस ट्रायल्सचा (Booster Dose Trial) अहवाल प्रसिद्ध केला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, या लसीचा प्रभाव परिणामकारक आहे. दीर्घकाळ संरक्षण मिळण्यास मदत होणार आहे तसेच कोणतेही गंभीर दुष्परिणाम देखील नाहीत. हैदराबादच्या या कंपनीने COVAXIN (BBV152) सुरक्षित असल्याचं जाहीर केले आहे.

कोवॅक्सिनच्या ट्रायल्समध्ये कोणत्याही गंभीर दुष्परिणामांशिवाय ती लॉंग टर्म सेफ्टी देत असल्याचं सांगण्यात आले आहे. 90% लस घेतलेल्यांमध्ये neutralizing antibody तयार झाल्या आहेत. या वाईल्ड टाईप स्ट्रेनशी सामना करू शकतात. हा डोस दुसर्‍या डोस नंतर सहा महिन्यांनी देण्यात आला होता. असे ऑफिशिएअल स्टेटमेंट मध्ये सांगितले आहे. हे देखील नक्की वाचा: दिलासादायक! '2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी Covaxin सुरक्षित'- Bharat Biotech चा दावा .

इतर लसींच्या तुलनेत कोवॅक्सिनचे दुष्परिणाम कमी आहेत. कोवॅक्सिनचा तिसरा डोस हा दुसरा डोस घेतल्यानंतर 6 महिन्यांनी देण्यात आला होता. त्याच्या अहवालात समोर आलेल्या माहितीनुसार, बुस्टर डोस नंतर homologous आणि heterologous SARS-CoV-2 variants विरूद्ध शरीरात निर्माण झालेल्या न्युट्रलायझिंग अ‍ॅन्टिबॉडीज 19 वरून 265 वर गेली. बूस्टर BBV152 लसीकरण सुरक्षित आहे. तसेच संक्रमण टाळण्यासाठी सतत प्रतिकारशक्ती नीट ठेवण्यासाठी आवश्यक असू शकते. COVID 19 Precautionary Dose Online Appointments: आजपासून सुरू होणार 'बुस्टर डोस' साठी ऑनलाईन अपॉईंटमेंट; पहा कसा, कधी, कोणाला मिळणार डोस .

भारतामध्ये येत्या 10 जानेवारीपासून कोविड 19 लसीकरण मोहिमेमध्ये बुस्टर डोस हा प्रिकॉशनरी डोस म्हणून देण्यास सुरूवात होत आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स, 60 आणि त्याच्यावरील नागरिक ज्यांना सहव्याधी आहेत अशांना हा तिसरा डोस दिला जाणार आहे.