दाऊद इब्राहिम याचा एकेकाळचा हस्तक कुख्यात एजाज लकडावाला (Ejaz Lakdawala) याला खंडणी आरोपाखाली काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तारिक परवीन आणि सलीम महाराज यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील एक प्रसिद्ध उद्योगपतीकडून तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर मुंबईतील पायधुनी पोलिसांकडून हे प्रकरण दाखल करुन घेण्यात आले आहे. दाखल केलेल्या तक्रारीनुसार एजाज लकडावाला याने उद्योगपती याच्याकडून साडेसात कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. मुंबई पोलिसांनी लकडावाला याला बिहारच्या पटना येथून अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी चौकशीत तारिक परवीन आणि सलीम महाराज यांची सुद्धा नावे पुढे आल्यानंतर अटक केले. या तीन आरोपींच्या विरोधात काही खुलासे होत आहेत. जस जशी चौकशी पुढे होत आहे त्याप्रमाणे अधिकाधिक राज सुद्धा समोर येत आहेत.
सुत्रांच्या मते, पायधुन पोलिसात जी तक्रार दाखल करण्यात आली आहे त्यानुसार एजाज लकडावाला याने खंडणीसाठी एक पत्र लिहित असे. त्याला लकडवाला कोड वर्डमध्ये लव्ह लेटर (Love Letter) असे म्हणत असे. हे लव्ह लेटर त्याने मुंबईतील एका उद्योगपतीला सुद्धा लिहिले होते. या लव्ह लेटरच्या माध्यमातून त्याने साडेसात कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.(दाऊद इब्राहिम याचा एकेकाळचा हस्तक कुख्यात एजाज लकडावाला याला पटना येथून अटक; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई)
तसेच तारिक परवीन आणि सलीम महाराज याची मदत करण्यासाठी मुंबई पोलीस अधिकारी प्रवीण पडवळ याचे सुद्धा नाव समोर आले आहे. प्रवीण पडवळ हा मुंबई वाहतूक पोलिसात एका अप्पर पोलीस आयुक्त आहे. असे सांगितले जात आहे की, त्याने या तिघांची मदत केलेली होती. पडवळ याच्यावर या दोन्ही आरोपींच्या विरोधात असलेले खंडणीचे पुरावे मिटवण्याचा आरोप आहे. त्यामुळे आता नाव समोर आल्यानंतर पडवळ धोक्यात सापडण्याची शक्यता आहे.
लकडावाला याच्या नावाची एवढी दहशत होती की त्याच्या नावावर खंडणीच्या विरोधात एकही गुन्हा पोलिसात दाखल करण्यात आलेला नाही. मात्र जेव्हा त्याला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.