फोर्ब्स मासिकाने (Forbes Magazine) नुकतेच जगातील सर्वात सामर्थ्यवान 100 महिलांची (World’s 100 Most Powerful Women) यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनादेखील स्थान मिळाले आहे. निर्मला सीतारमण यांना 34 व्या स्थानावर जागा देण्यात आली आहे. या यादीमध्ये 40 व्या स्थानावर राणी एलिझाबेथ द्वितीय आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आणि सल्लागार इव्हांका ट्रम्प यांना 42 वे स्थान देण्यात आले आहे. या यादीमध्ये जर्मन चांसलर अँजेला मर्केल (Angela Merkel) यांनी प्रथम स्थान पटकावले आहे.
दुसर्या क्वीन एलिझाबेथशिवाय, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा आर्र्डन यांच्यापुढे भारताच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांना स्थान देण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. तसेच जरी त्यांच्यावर भारतीय ढासळत असलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अपयशी ठरल्याबद्दल हल्ला करण्यात आला असला, तरी फोर्ब्सच्या जगातील 100 सर्वात सामर्थ्यवान महिलांच्या यादीमध्ये सीतारमण यांना स्थान दिल्याने जागतिक पातळीवर भारताची वाढत असलेली शक्ती दिसून येते. (हेही वाचा: Forbes Rich List 2019: मुकेश अंबानी सलग 12 वेळा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; पाहा टॉप 10 श्रीमंतांची यादी)
जगातील सर्वात शक्तिशाली 10 महिला -
- अँजेला मर्केल
- क्रिस्टीन लागार्डे
- नॅन्सी पेलोसी
- उर्सुला वॉन डेर लेयन
- मेरी बार
- मेलिंडा गेट्स
- अबीगैल जॉनसन
- आना पेट्रीसिया बोटिन
- गिन्नी रोमेटी
- मारिलिन हेवसन
सीतारमण यांच्या व्यतिरिक्त फोर्ब्सच्या यादीत इतर भारतीय व्यक्तींमध्ये 54 व्या स्थानावर रोशनी नादर मल्होत्रा आणि 65 व्या स्थानावर किरण मजुमदार शॉ यांचा समावेश आहे. जागतिक स्तरावरील व्यक्तींविषयी बोलायचे झाले तर, या यादीमध्ये रिहाना (61), बियॉन्से (66), टेलर स्विफ्ट (71), सेरेना विल्यम्स (81), रीझ विदरस्पून (90) आणि ग्रेटा थनबर्ग (100) यांचा समावेश आहे.