Firing Outside Salman Khan's House: सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार, घटनास्थळी फॉरेंन्सिक टीमचे तपास सुरु
Firing Outside Salman Khan's House: PC ANI

Firing Outside Salman Khan's House: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या  (Salman Khan) घराबाहेर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. अज्ञातांनी गोळीबार (Firing) केली आहे. घटनेची माहिती पोलिसांना देताच, घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहे. बांद्रा येथील गॅलेक्सी अपार्टमेट (Galaxy Apartment) निवासाबाहेर पहाटे 4.55 वाजता गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. (हेही वाचा- सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, घटनेत कोणतीही जीवितहानी नाही)

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे दोन अज्ञात दुचाकीवरून आले आणि सलमान खानच्या  गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर गोळीबार केला. हवेत दोन ते तीन वेळा गोळीबार केला. या गोळीबारात कोणतीही जीवित हानी झाली नाही. पोलिसांना घटनेची माहिती देताच, घटनास्थळी वांद्रा पोलिस, फॉरेंन्सिक टीम आणि क्राईम ब्रॅंच पोलिस दाखल झाले आहे. पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. घटनास्थळी चौकशी तपासणी सुरु आहे. घटनास्थळी फॉरेंन्सिक टीम काम करत आहे. गोळीबारच्या घटनेवेळी सलमान खान घरात होते.

कोणत्या हेतूने गोळीबार केला हे अद्याप समोर आले नाही. दोन ते तीन वेळा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही डीव्हीआर ताब्यात घेतला आहे. पोलिस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर लवकरच सुरक्षा वाढवण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे.