Firing Outside Salman Khan's House: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, दोन हल्लेखोर दुचाकीवरून बांद्रातील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर आले होते. घटनेची माहिती पोलिस देण्यात आली.त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. पहाटे ४.५५ वाजता ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. ही घटना जेव्हा घडली त्या वेळीस सलमान खान घरीच होते अशी माहिती मिळाली आहे. सलमान खान यांच्या जीवाला धोका असल्याची संशय अनेकांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी क्राईम ब्रॅंच आणि एटीएसची टीम पोहचली अशून तपास सुरु आहे. दोन ते तीन वेळा गोळीबार झाला अशी माहिती देण्यात आली आहे. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)