Finance Minister Arun Jaitley (Photo Credits: ANI)

बहुतांश वस्तूंवरील जीएसटी (GST) दर कमी करण्यात आले आहेत. हे दर 28% वरुन 18% करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) यांनी केली आहे. जीएसटी परिषदेच्या 31 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अरुण जेटली यांनी ही माहिती दिली.

एकूण 33 वस्तूंवर जीएसटी कपात करण्यात आली आहे. 26 वस्तूंवरील जीएसटी 12% ते 5% करण्यात आला आहे. तर बाकी सहा वस्तूंवरील जीएसटी 28 वरुन 18% करण्यात आला आहे. हे नवे दर 1 जानेवारी 2019 पासून लागू करण्यात येणार आहेत. टीव्ही, वॉशिंग मशीन यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरील GST मध्ये घट

सिमेंट आणि ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये ही जीएसटीची कपात करण्यात आली आहे. त्याचबरोबर टीव्ही, संगणक, टायर, 100 रुपयांवरील सिनेमाची तिकिटे यांवरच्या जीएसटीत कपात करण्यात आली आहे.

कॉम्प्युटरचे मॉनिटर, टीव्ही, टायर, पावर बँक आणि 100 रुपयांवरचे सिनेमा तिकीटांवरील कर 28 टक्क्यांवरून 18 टक्के केल्याची घोषणा केली.

फूटवेअरवरचा जीएसटी 12 ते 5 टक्के असा करण्यात आला आहे. तर फ्रोझन व्हेजिटेबल्स वरील जीएसटी 5% वरुन शून्य टक्क्यांवर आणण्यात आला आहे. थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स 19 टक्क्यांवरून 12% करण्यात आला आहे. इतकंच नाही तर धार्मिक यात्रांवरचा जीएसटी 18 वरून 12% करण्यात आला आहे.