टीव्ही, रेफ्रीजिरेटर, वॉशिंग मशीन आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर जीएसटीचे दर कमी झाले आहेत. पूर्वी 31% असणारा जीएसटी दर आता 18% करण्यात आला आहे. अर्थ मंत्रायलयाने दिलेल्या माहितीनुसार, एसी आणि वाहन यांसारख्या लग्झरी वस्तूंवरील जीएसटीचे दर कमी झाले आहेत. आता 99% सामानावर फक्त 18% जीएसटी (GST) लागू होईल.
अर्थ मंत्रालयाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 31 लग्झरी सामानांवर 28% जीएसटी लागू आहे. मात्र 2017 नंतर यात देखील घट झाली आहे. जीएसटीचा कायदा 1 जुलै 2017 मध्ये लागू करण्यात आला होता. या कायद्याअंतर्गत वस्तूंवर जीएसटी दर 5, 12, 18 आणि 28% आहे.
27 इंच टेलिव्हीजन सेट, रेफ्रीजिरेटर, वॉशिंग मशीन, मिक्सर, ज्यूसर, वॅक्यूम क्लिनर, गीझर, पंखे आणि कूलर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर आता 18% जीएसटी लागू होईल. यापूर्वी हा दर 31.3% होता.
मोबाईलवर देखील 18-25% असलेला जीएसटी 12% होणार आहे. फर्निचरवर 25-31% असणारा जीएसटी दर 18% वर आला आहे.
वाहन, एसी, डिशवॉशिंग मशीन, डिजिटल कॅमेरा, व्हिडिओ गेम्स कंसोल्स आणि मॉनिटर, प्रोजेक्टर यावर 31.3% असलेला जीएसटी कमी होऊन 28% झाला आहे. याशिवाय 100 रुपयांहून कमी किंमतीच्या सिनेमा तिकीटांवर 35% असलेला जीएसटी 28% झाला आहे. 5 स्टार हॉटेल्स मध्ये राहण्याच्या दरांवर 30-50% असणारा जीएसटी कमी होऊन 28% करण्यात आला आहे.
आतापर्यंत अनेक वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्यात आले असून जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत यावर अधिक विचार केला जाईल. इतर वस्तूंवरील जीएसटी दर 28% च्या खाली आणले जातील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.