लज्जास्पद! केवळ 70,000 रुपयांसाठी जन्मदात्या पित्यानेच विकले आपल्या 1 महिन्याच्या बाळाला, हैदराबाद मधील धक्कादायक घटना
Baby (Photo Credits; Pixabay) (Representational image Only)

आईबाबा होणं हे प्रत्येक जोडप्यासाठी खूपच सुखावह आणि मोठी गोष्ट असते. मात्र तोच जन्मदात्या पिता केवळ थोड्या पैशांसाठी आपल्या बाळाला विकतो ही गोष्ट ऐकली तरी मनात धस्स होतं. मात्र अशी घटना घडली आहे हैदराबादमध्ये (Hydrabad) .. येथे एका जन्मदात्या पित्यानेच केवळ 70 हजारांसाठी आपल्या एका महिन्याच्या बाळाला विकल्याचे समोर आले आहे. इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या बाळाचा शोध घेतला असून त्याला बाल कल्याण विभागाकडे ठेवण्यात आले आहे. आपल्या पतीनेच आपल्या बाळाला विकल्याची तक्रार या चिमुकल्याच्या आईने पोलिसांकडे केली होती.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या बाळाची शोधमोहिम सुरु केली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या बाळाचा शोध घेतला. या बाळाचे आई-वडिल फुटपाथवर राहतात. आपला गुजराण करण्यासाठी ते भीकही मागतात अशी माहिती पोलिसांनी दिली.हेदेखील वाचा- Pune: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीचे अपहरण करून बलात्कार; आरोपीला अटक

पोलिसांनी पुढे असेही सांगितले, फुटपाथावर राहणा-या या कुटूंबाचे एक सधन जोडप्याचे ब-याच दिवसांपासून निरीक्षण सुरु होते. एकदा त्यांनी त्या बाळाच्या वडिलांची भेट घेतली. आणि बाळाच्या बदल्यात 70 हजार रुपयांची ऑफर दिली. त्या बाळाच्या वडिलांनी ही ऑफर स्विकारून त्या बाळाला विकले.

याप्रकरणी जुवेनाईल जस्टिस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आसून या बाळाची रवानगी सरकारच्या बाल कल्याण विभागाकडे करण्यात आली असून अद्याप पुढील तपास सुरु आहे.

काही दिवसांपूर्वी वसई येथे असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. मुलाची अपेक्षा असताना पुन्हा एकदा मुलगी झाली म्हणून जन्मदात्या आईनेच चिमुकलीचा जीव घेतल्याची घटना घडली. तर सदर महिलेने 2 महिन्याच्या चिमुकलीला पाण्याच्या टाकीत बुडवून तिची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली असून तिच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.