Farmer's Protest: शेतकऱ्यांसोबत केंद्राच्या कोणत्याही मंत्र्याने खुल्या पद्धतीने बातचीत करावी, अरविंद केजरीवाल यांचे आव्हान
अरविंद केजरीवाल (Photo Credits-ANI)

Farmer's Protest: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी कृषी कायदा मागे घेण्याचे अपील करत शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करत आहेत. नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यापासून सिंघु बॉर्डवर आंदोलन करत असलेल्या हजारो शेतकऱ्यांना भेटण्यासाठी अरविंद केजरीवाल पोहचले होते. त्यावेळी त्यांनी असे ही म्हटले की, मी कोणत्याही केंद्रीय मंत्र्याला आव्हान करतो त्यांनी शेतकऱ्यांसोबत खुल्या पद्धतीने बाचतीत करुन दाखवावी. त्यामुळे असे कळेल की, कृषी कायदा हा लाभदायक आहे की नाही.(Rahul Gandhi On Farm Laws: देशात लोकशाही केवळ कागदोपत्री, पंतप्रधान केवळ उद्योगपतींसाठी काम करतात- राहुल गांधी)

मुख्यमंत्री अरविंद केजरीवार यांच्यासह उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सुद्धा उपस्थितीत होते. यापूर्वी केजरीवाल यांनी 7 सप्टेंबरला दिल्ली-हरियाणाच्या सिंघु बॉर्डवरील शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी असे म्हटले की, शेतकरी आपल्या आयुष्यासाठी आंदोलन करत आहेत. हा कायदा जमिन हिसकावून घेईल. मी हात जोडून अपील करतो की त्यांनी हे तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत.(Farmer's Protest: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 27 डिसेंबरला असणारी  'मन की बात' संपेपर्यंत प्रत्येकाने थाळ्या वाजवाव्यात,  शेतकरी संघटनेचे आवाहन)

Tweet:

मनीष सिसोदिया यांनी आंदोलक शेतकऱ्यांना असे म्हटले की, आम्ही सर्व व्यवस्थेवर जवळून नजर ठेवत आहोत. तसेच तुम्हाला कमीत कमी त्रास व्हावा याचा सुद्धा प्रयत्न करत आहोत. सिंघु बॉर्डवरील दौऱ्या वेळी केजरीवाल यांनी दिल्ली सरकारकडून करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा ही घेतला. तर सिंघु बॉर्डवर करण्यात येणाऱ्या आंदोलनात पंजाबसह हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचा ही समावेश आहे.