INS Ranvir (फोटो सौजन्य - Wikipedia)

INS Ranvir Explosion: तीन वर्षांपूर्वी आयएनएस रणवीर (INS Ranvir)वर झालेल्या स्फोटाप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात एका खाजगी गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2022 मध्ये झालेल्या या स्फोटात 3 जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना 18 जानेवारी 2022 रोजी दुपारी 4:30 ते 5:00 च्या दरम्यान घडली. त्यावेळी, आयएनएस रणवीर नोव्हेंबर 2021 पासून पूर्व नौदल कमांडकडून क्रॉस-कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होते आणि ते त्याच्या तळावर परतणार होते.

3 खलाशी ठार -

आयएनएस रणवीरवरील भीषण स्फोटात तीन खलाशांचा मृत्यू झाल्यानंतर तीन वर्षांनी, कुलाबा पोलिसांनी एका खाजगी गॅस कंपनीविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. 18 जानेवारी 2022 रोजी झालेल्या या स्फोटात 3 नौदल कर्मचारी ठार झाले होते. तसेच 11 जण जखमी झाले होते. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाने या घटनेचा सखोल तपास केला आहे आणि त्यांच्या अहवालाच्या आधारे, लेफ्टनंट कमांडर सचिन कुमार यांनी मुंबईतील कुलाबा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला आहे. एका खाजगी गॅस कंपनीच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने, पोलिस नंतर कंपनीशी संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणात चौकशीसाठी बोलावू शकतात. (हेही वाचा - Air India कडून निष्काळजीपणाचा ठपका ठेवत Simulator Trainer Pilot निलंबित; प्रशिक्षणार्थी 10 पायलट्सना देखील सध्या Flying Duties ठेवले दूर)

सुमारे 4 हजार टन वजनाच्या या युद्धनौकेच्या एअर कंडिशनिंग डब्यात बिघाड झाल्यामुळे हा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटात क्रू मेंबर्सना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना तातडीने कुलाब्यातील आयएनएचएस अश्विनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. स्फोट झाला तेव्हा जहाजावर सुमारे 300 नौदल कर्मचारी होते. (हेही वाचा - Naval Dockyard Mumbai: : नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे INS रणवीरच्या युद्धनौका स्फोट प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद)

चुकीचा गॅस भरण्यात आला -

या घटनेनंतर, स्फोटाचे कारण तपासण्यासाठी एक चौकशी मंडळ स्थापन करण्यात आले आणि एसी युनिटचे नमुने तपासणीसाठी सेंटर फॉर फायर, एक्सप्लोझिव्ह अँड एन्व्हायर्नमेंटल सेफ्टी (CFEES), DRDO, नवी दिल्ली तसेच IIT बॉम्बे येथे पाठवण्यात आले. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, गॅस पुरवठादाराने चुकीच्या प्रकारचा गॅस पुरवल्यामुळे स्फोट झाला, ज्यामुळे युनिटमध्ये समस्या निर्माण झाल्या आणि स्फोट झाला. प्रत्यक्षात युनिटमध्ये फ्रीऑन आर 22 गॅस वापरला जाणार होता. पण कंपनीने त्याऐवजी फ्रीऑन आर 152 ए पुरवला, ज्याचे काही अंश तपासादरम्यान आढळले. (Kirit Somaiya INS Vikrant Case: आयएनएस विक्रांत प्रकरणात किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ, जमा केलेल्या पैशांच्या तपासाचे कोर्टाकडून नव्याने आदेश)

सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून येत्या काळात पोलिस अधिकारी खाजगी कंपनीच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करू शकतात. नौदलाच्या अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून, कुलाबा पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 304 A अ आणि 437 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.