टाईम्स नाऊचा एक्झिट पोल उत्तर प्रदेशमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना मिळून 225 जागा मिळवू शकतो असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला समाजवादी पक्ष आणि इतरांना 151 जागा मिळू शकतात. तर बसपा 14, काँग्रेस 9 आणि इतरांना 4 जागा मिळण्याची शक्यता आहे.
Uttar Pradesh Election 2022 Exit Poll LIVE: उत्तर प्रदेशमध्ये भाजप बहुमताच्या सरकारची शक्यता- टाईन्स नाऊ एक्झिट पोल्स
Uttar Pradesh Election 2022 Exit Poll LIVE: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 चे एक्झिट पोल हळूहळू जाहीर होऊ लागले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज शेवटचा टप्पा पार पडला. सायंकाळी 6 वाजता मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर सायंकाळी 6 वाजता एक्झिट पोल्सचे निकाल जारी करण्यात येत आहेत. कोणता एक्झिट पोल्स काय अंदाज दर्शवतो आहे याबाबत आम्ही येथे माहिती देत आहोत.
मतदानापूर्वी झालेल्या ओपिनीयन पोलच्या अंदाजानुसार (Opinion Poll Predictions) उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजप (BJP) आणि समाजावादी पार्टी (SP) या दोन्ही पक्षांत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळेल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) भाजपचा चेहरा आहेत. तर समाजवादी पक्षाकडून अखिलेश यादव (Akhilesh Yadav) प्रमुख चेहरा आहेत.
उत्तर प्रदेशची जनता कोणाच्या पारड्यात आपले जनमत टाकते हे 10 मार्च रोजीच कळणार आहे. 10 मार्च रोजी उत्तर प्रदेश राज्यासह गोवा, पंजाब, मणपूर आणि उत्तराखंड आदी राज्यांमध्ये झालेल्या मततानाचीही मतमोजणी होणार आहे. त्यानंतर भारतीय निवडणूक आयोग (Election Commission Of India) निकाल जाहीर करणार आहे.