Haldi Kunku Invitation Marathi Messages Format: मकर संक्रातीच्या हळदी कुंकू समारंभासाठी 'निमंत्रण पत्रिका', पाहा
हळदी कुंकूचा सोहळा उत्साहात साजरा केला जातो त्यामुळे मकर संक्रातीच्या उत्सवाला सगळ्या महिला उत्सुक असतात आणि 1 महिनापूर्वीपासून तयारीला लागतात, त्यामुळे आम्ही निमंत्रण पत्रिकेचे नमुने तुमच्या घेऊन आलो आहे, पाहा
Haldi Kunku Invitation in Marathi: महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मकर संक्रांती हा नवीन वर्षातला पहिला सण आहे. नवीन वर्षातला पहिला सण उत्साहात साजरा केला जातो. मकर संक्रांतीला पुरुष मंडळी पतंगबाजीचा आनंद घेतात आणि महिला हळदी कुंकुच्या कार्यक्रमात व्यस्त असतात. नववर्षातील या पहिल्या सणाच्या औचित्याने सार्या जणी एकत्र भेटतात. हळदी कुंकू आणि तिळगुळची देवाणघेवाण केली जाते. एकमेकींना तिळगूळासोबतच एखादं वाण म्हणजे भेटवस्तू देण्याची पद्धत आहे. या कार्यक्रमाचे यंदा जर का तुम्हीही तुमच्या घरी आयोजन करणार असाल तर त्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आमंत्रित करायला या खास आयडीयाज आम्ही घेऊन आलो आहोत. तुम्हीपण तुमच्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार करत असाल तर, आजकालच्या डिजिटल जगात तर या पत्रिकांसाठी फार खर्चही येणार नाही. तुम्हाला हवं असल्यास प्रिंट लढून किंवा थेट WhatsApp Messages,Images च्या माध्यमातून देखील तुम्ही मैत्रिणी व नातेवाईकांना या हळदी कुंकुच्या पत्रिका पाठवू शकाल.
पाहा
नमुना 1
हास्याचे हलवे , तीळ गुळाची खैरात
लुटून वाण, साजरा करू सण उत्साहात
रथसप्तमीच्या या शुभ मुहूर्तावर
आमच्या घरी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे.
आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवावी..
तारीख:
वेळ:
पत्ता:
नमुना 2
साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
आमचे येथे दि. .... रोजी साय॑काळी .. वाजता
हळदी कुंकू आयोजिले आहे.
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण...
पत्ता:
नमुना 3
लेडीज अँड लेडीज
एकदा किटी पार्टी पेक्षा
हळदी कुंकू समारंभात भेटू
कुठे?:
कधी?:
काय मग येताय ना?
नमुना 4
विसरुनी सारी कटुता
नात्यात तीळगुळाचा गोडवा यावा
एकमेकांच्या साथीने हा आनंदाचा सोहळा रंगावा
दिनांक.. रोजी एकत्र भेटून
हळदी कुंकू करण्याचे योजिले आहे. याकरिता आग्रहाचे आमंत्रण..
नमुना 5
चला सयांनो संस्कृती जपू..
रथसप्तमीच्या मुहूर्तावर आयोजित
हळदी कुंकू कार्यक्रमासाठी
आमच्या घरी अगत्याने येणे करावे..
तारीख:
वेळ:
पत्ता:
हळदी कुंकूचा सोहळा उत्साहात साजरा केला जातो त्यामुळे मकर संक्रातीच्या उत्सवाला सगळ्या महिला उत्सुक असतात आणि 1 महिनापूर्वीपासून तयारीला लागतात, त्यामुळे आम्ही निमंत्रण पत्रिकेचे नमुने तुमच्या घेऊन आलो आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 15, 2022 01:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

