नोकरदार वर्गासाठी सरकारकडून दिवाळी गिफ्ट, 6 कोटी लोकांच्या PF खात्यात थेट रक्कम होणार ट्रान्सफर
EPF | (Photo Credits: PTI)

दिवाळीपूर्वी कर्मचारी भविष्य निधी संगठन (EPFO) यांच्याकडून 6 कोटींहून अधिक ग्राहकांसाठी खुशखबर आहे. कारण अर्थमंत्रालयाने 6.5 कोटी खातेधारकांच्या खात्यात व्याजाची रक्कम ट्रान्सफर करण्यास मंजुरी दिली आहे. EPFO चे आर्थिक वर्ष 2020-21 साठी 8.5 टक्के व्याज EPF टक्के व्याज EPF ग्राहकांच्या खात्यात जमा करणार आहे. गेल्या आर्थिक वर्षात (2019-20) मध्ये KYC मध्ये झालेल्या चुकांमुळे व्याज मिळण्यासाठी बहुतांश ग्राहकांना 8-10 महिने थांबावे लागले होते. देशात 6.5 कोटी लोक हे PF च्या अंतर्गत येतात.

इकोनॉमिक्स टाइम्स यांच्यासोबत बातचीत करताना श्रम सचिव सुनिल बर्थवाल यांनी असे म्हटले की, मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे एका आठवड्याच्या आतमध्येच याचे नोटिफिकेशन जाहीर केले जाणार आहे. तर ईपीएफओ मध्ये नोंदणीकृत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12 टक्के हिस्सा हा पीएफमध्ये जमा करावा लागतो. ऐवढाच हिस्सा कंपनीकडून त्यांच्या खात्यात जमा केला जातो. कंपनी तुमच्या वेतनातून पीएफ कापून घेते. तर कंपनीने तुमचा पीएफ हा ईपीएफओमध्ये जमा करावा ही त्यांची जबाबदारी असते.(Shaktikanta Das यांची Reserve Bank of India च्या Governor पदी पुन्हा नियुक्ती)

>'या' पद्धतीने जाणून घ्या EPF खात्यासंबंधिक घरबसल्या अधिक माहिती

EPFO खातेधारकांना आपला EPF बॅलेन्स तपासून पाहण्यासाठी EPDO च्या रजिस्टर्ड आपला मोबाइल क्रमांक SMS पाठवू शकता. रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरुन EPFOHO UAN लिहून 7738299899 वर SMS करावा.

-सर्वात प्रथम EPFO ची वेबसाइट epfindia.gov.in ला भेट द्यावी

-Services सेक्शनमध्ये जाऊन For Employees वर क्लिक करा

-त्यानंतर Services सेक्शन मध्येच Member Passbook वर क्लिक करा

-UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा भरुन लॉग इन करा. नव्या पेजवर आपला मेंबर ID ची निवड करा.

-View Passbook वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला येथे PF खात्यासंबंधित सर्व माहिती मिळेल. त्याचसोबत व्याजाची रक्कम सुद्धा पाहता येईल.

EPFO ग्राहक हे UMANG App च्या माध्यमातून सुद्धा शिल्लक रक्कम तपासून पाहू शकतात. त्यासाठी प्रथम उमंग अॅप सुरु करत EPFO वर क्लिक करा. असे केल्यानंतर Employee Centri Services वर क्लिक करा. पासबुक ऑप्शन निवडल्यानंतर युएएन क्रमांक आणि पासवर्ड टाका. रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल. तो दिल्यानंतर तुम्हाला ईपीएफचा बॅलेन्स दिसेल.