EPFO खातेधारकांना मोठा दिलासा, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या परिस्थितीत काढता येणार COVID19 Advance
EPFO (Photo Credits-Facebook)

कर्मचारी भविष्य निधि संगठन (EPFO) कडून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या परिस्थिती दरम्यान आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. त्यानुसार त्यांनी एक मोठी घोषणा करत असे म्हटले आहे की, ईपीएफओच्या ज्या ग्राहकांनी गेल्या वर्षात कोविड फंड अंतर्गत पैसे काढले होते त्यांना आता दुसऱ्या वेळेस ही नॉन-रिफंडेबल कोविड19 अॅडवान्स काढण्याची परवानगी दिली आहे. हा निर्णय कोरोनाच्या परिस्थितीमुळे मार्च 2020 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत घेण्यात आला होता. त्यामुळे कोरोनाच्या काळात आर्थिक गरजा पूर्ण करता येईतील हा त्यामागील मुख्य हेतू होता.

या तरतूदीअंतर्गत ग्राहकांना आपल्या PF खात्यामधील जमा रक्कमेच्या 75 टक्के किंवा 3 महिन्यांचा पगार (बेसिक आणि डीए) समान रक्कमेमधील जी कमी असणार त्याच्या ऐवढीच रक्कम काढता येणार आहे. सदस्यांना यापेक्षा कमी पैशासाठी सुद्धा अर्ज करु शकतात.कोरोना व्हायरसच्या दरम्यान कोविड अॅडवान्स मधून एपीएफओ सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खासकरुन ज्यांचे वेतन 15 हजार रुपयांहून कमी आहे. ईपीएफओच्या मते आतापर्यंत 76.63 लाख कोविड अॅडवान्स क्लेम 18,689.15 कोटी रुपये दिला आहे.(Mann Ki Baat May 30, 2021 Highlights: मन की बात द्वारा आज देशावासियांशी संवाद साधताना पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या स्थितीत म्युकरमायोसिस म्हणजेच ब्लॅक फंगसला सुद्धा महारोग म्हणून घोषित करण्यात आले आहे. या संकटकाळात ईपीएफओ कडून प्रयत्न केला जात आहे की, त्यांनी सदस्यांची आर्थिक गरजा पाहून त्यांची मदत करावी. अशातच ज्या सदस्यांनी पहिल्या वेळेस सुद्धा कोविड19 अॅडवान्स घेतला आहे त्यांना सुद्धा तो दुसऱ्या वेळेस ही घेता येणार आहे. दुसऱ्या वेळेस कोविड19 अॅडवान्स घेण्याची प्रक्रिया सुद्धा आधीसारखीच असणार आहे.