देशात दहशतवादी हल्ल्यांनी तोंड वर काढले असताना गुजरात येथील 'स्टॅच्यू ऑफ यूनिटी'वर (Statue Of Unity) दहशतवादी हल्ला होणार असल्याच्या ईमेलने (E-mail) एकच खळबळ उडाली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज भारत बंद, CAIT च्या आवाहनानंतर महाराष्ट्रात पहा कोणकोणत्या सेवांवर होणार परिणाम
14 फेब्रुवारीला जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर गुजरात मधील नर्मदा जिल्ह्यातील सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या पुतळ्यावर 'स्टॅच्यू ऑफ यूनिटी'वर हल्ला होणार असल्याची माहिती समोर येत आहे. एका ईमेलमध्ये याचा खुलासा करण्यात आला आहे.
सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'स्टॅच्यू ऑफ यूनिटी' समवेत गुजरातमधील तीर्थक्षेत्रं आणि रेल्वे स्टेशन्स वर हल्ला होणार असल्याचा अंदाज आहे.
या ईमेलची गंभीर दखल घेत अहमदाबाद क्राईम ब्राँच आणि अँटी टेररिस्ट स्क्वॉड (एटीएस) यांना तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. इतकंच नाही तर राज्यातील पोलिस विभागालाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर ईमेलची सत्यता पडताळून पाहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.