Husband Wife | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

केरळमधील (Kerala) तिरुअनंतपुरम (Thiruvananthapuram) जिल्ह्यातील मलयिन्कीझ पोलीसांनी (Malayinkeezhu police) एका 27 वर्षीय इसमाला अटक केली आहे. पत्नीला बेदम मारहाण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पत्नीला बेदम मारहाण करत असताना त्याने या प्रकाराचे व्हिडिओ चित्रिकरण केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. दिलीप असे या इसमाचे नाव आहे. पत्निला मारहाण करताना चित्रित केलेला व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचला त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, दिलीप याने पत्नीला बेदम मारहाण केली कारण ती त्याच्या इच्छेविरुद्ध नोकरीला जात होती. नोकरी सोड म्हणून त्याने पत्नीला अनेकदा आग्रह केला. परंतू, तीने ऐकले नाही. सूपरमार्केटमध्ये नोकरीस जाणे पत्नीने कायम सुरुच ठेवले. त्यामुळे चिडलेल्या दिलीप (पती) याने तिला बेदम मारहाण केली आणि त्याचा व्हिडिओही बनवला. जो इंटरनेटवर व्हायरल झालाहोता. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिलेचा चेहरा रक्ताने माखलेला होता. पत्नीने नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी खुनाचा प्रयत्न आणि इतर अनेक आरोपांखाली आरोपी पती दिलीपला अटक केली आहे. (हेही वाचा, Wife Swapping: 'वाईफ स्वॅपींग'साठी पत्नीचा नकार, चिडलेल्या पतीकडून बेदम मारहाण आणि अनैसर्गीक सेक्स, पोलिसांत गुन्हा दाखल)

दरम्यान, या आधी जूनमध्ये मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात एका महिलेला मारहाण करण्यात आली होती. दुस-या पुरुषाशी कथित संबंध असल्याच्या कारणावरून तिच्या पतीला चपलांचा हार घालून तिला खांद्यावर घेऊन जाण्यास गावकऱ्यांनी भाग पाडले होते. देवास जिल्ह्यातील बोरपाडाव गावात ही घटना घडली होती. याबाबत एएनआयने वृत्त दिले होते.