'वाईफ स्वॅप' (Wife Swap Game) खेळात सहभागी होण्यास पत्नीने नकार दिल्याने चिडलेल्या पतीकडून सदर महिलेस मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना राजस्थान (Rajasthan ) राज्यातील बिकानेर (Bikaner) येथे एका हॉटेलच्या खोलीत घडली. या प्रकरणी भोपाळ (Bhopal) येथे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराचा महिलेचा पती बिकानेरमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मॅनेजर होता.
पिडितेने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, घटना घडली त्या दिवशी अम्मार (पती) याने पीडितेला बिकानेर येथील हॉटेलच्या खोलीत बंद केले आणि तिचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर तो दोन दिवसांनी मद्यधुंद अवस्थेत तिथे पोहोचला. सातत्याने मद्यसेवन करणे, ड्रग्ज घेणे आणि वेगवेगल्या मुली, महिला, मुले आणि पुरुष यांच्याशी शरीरसंबंध ठेवणे हे त्याच्यासाठी अत्यंत सामान्य बाब होती. (हेही वाचा, Wife Swapping: पॉर्न पाहून दोस्तासोबत सेक्स करण्यासाठी पतीचा बायकोवर दबाव; पालकांचाही मुलाला पाठींबा)
पोलिसांनी पुढे सांगितले की, 'वाईफ स्वॅप' बद्दल त्याने यापूर्वी तिला सांगितले होते. मात्र, या प्रकारात सहभागी होण्यास त्याने प्रथमच तिला आग्रह केला. या वेळी तिने त्यास नकार दिला. त्यामुळे तो चिडला. त्याने मला संस्कारहीन म्हटले आणि मला मारहाण केली. त्यानंतर त्याने माझ्याशी अनैसर्गिक पद्धतीने शरीरसंबंध ठेवले, असेही पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. त्याने केलेली मारहाण आणि अनैसर्गिक सेक्स असहय्य झाल्याने तिने पोलिसांमध्ये तक्रार दिली.
पोलिसांमध्ये पीडितेने केलेल्या तक्रारीनुसार, तिने आरोप केला आहे की, तिच्या पतीने तिच्याकडे 50 लाख रुपयांच्या हुंड्याची सातत्याने मागणी केली होती.पतीच्या या मागणीबद्दल आणि इतर त्रासाबद्दल तिने साररच्या लोकांकडे म्हणजेच सासू, सासऱ्यांकडे वारंवार तक्रार केली. परंतू, त्यांनी तिच्या तक्रारीकडे कधीच लक्ष दिले नाही. उलट अतिपुढारलेली म्हणून हिनवले.
पीडितेने आरोप केला आहे की, पतीने केलेल्या मारहाणीनंतर तिची प्रकृती अधिकच खालावली. तरीही तो अनेक महिने मारहाण करत राहिला. कालांतराने तिला तिच्या नातेवाईकांनी तिच्या माहेरच्या घरी नेले आणि तिच्यावर उपचार करुन तक्रार दाखल केली.