वाईफ स्वॅपींग (Wife Swapping) प्रकारातील एका प्रकरणाने गुजरात राज्यातील अहमदाबाद (Ahmedabad) येथील घाटलोडिया (Ghatlodia) परिसरात खळबळ उडवून दिली आहे. या घटनेत पॉर्न व्हिडिओ (Porn Video) पाहून दोस्तासोबत सेक्स करण्यासाठी एका पतीने स्वत:च्याच पत्नीवर दबाव टाकल्याचा प्रकार पुढे आला आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडिता आणि तिचा पती यांचा 2015 मध्ये विवाह झाला आहे.
प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तात म्हटले आहे की, पीडिता आणि तिचा पती जानेवारी महिन्या दोस्तांसोबत मनाली येथे फिरायला गेले होते. इथे गेल्यावर पतीने पत्नीला आपल्या दोस्तासोबत झोपण्यास व शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले. पीडितेने त्यास विरोध करताच त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तरीही पीडितेने नकार दिला. त्यानंतर पतीने तिला मारहाण केली. या वेळी पतीने तिला अश्लील व्हिडिओ (Porn) पाहण्यासाठी जबरदस्तीने प्रवृत्त केले. धक्कादायक म्हणजे पतीच्या कृत्या त्याच्या पालकांनीही पतीला मदत केली. तसेच, पीडितेवर असे कृत्य करण्यासाठी दबाव टाकला.
पीडितेने आरोप केला आहे की, आपला पती हा त्याच्या मित्रांसमोर आपल्याशी अत्यंत वाईट आणि अश्लिल भाषेत बोलत होता. तसेच, तो समोर उपस्थित असतानाही पत्नीची आदलाबदली (वाईफ स्वॅपींग) करण्याबातब विषय काढून सारखे त्याविषयी बोलत होता. नशीली औषधे देऊन पतीने आणि त्याच्या मित्राने आपले आक्षेपार्ह फोटो काढल्याचा आरोपही पीडित पत्नीने केला आहे. तसेच, मित्रासोबत संबंध ठेवले नाहीत तर, घटस्फोट देण्याची धमकीही पतीने दिल्याचे पत्नीने म्हटले आहे. (हेही वाचा, तुम्हीही 'पॉर्न'च्या आहारी गेला आहात? मग या Porn Addiction बद्दलच्या काही धक्कादायक गोष्टी वाचाच)
अहमदाबाद मिररने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिलेकडून कोऱ्या कागदांवर तिच्या सह्या घेण्यात आल्या. तसेच, मनालीवरुन परतल्यावर तिच्या (पीडितेच्या) आईवडीलांना बोलावण्यात आले. या वेळी दोघांमध्ये चर्चा झाली. दरम्यान, पतीच्या दोस्ताने तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यही केले. या प्रकारानंतर पतीने पीडितेच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तिला घर सोडण्यास सांगितले.