सरकारने सध्या देशात 700 पेक्षा जास्त पॉर्न (Porn) साईट्सवर बंदी घातली आहे, मात्र तरी पॉर्न पाहणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झालेली दिसून येत आहे. यामध्ये आता स्त्रीयाही तितक्याच प्रमाणात सामील आहेत. पॉर्न पाहणे ही काही वाईट गोष्ट नाही, मात्र ते प्रमाणात पाहणे गरजेचे आहे. पॉर्न बघून केलेल्या अत्याचाराची अनेक उदाहरणे आपण पहिली असतील. अशी कृत्ये ही विकृती आहे, जी पॉर्न पाहण्याच्या आहारी गेलेल्या व्यक्तीमध्ये निर्माण होते. फक्त इतकेच नाही तर यामुळे अनेक शारीरिक समस्याही उद्भवत असल्याचे निदर्शनास आले आहे. तर तुम्हालाही पॉर्न पहायची सवय जडली असेल तर या गोष्टी तुम्ही वाचल्याच पाहिजेत
> पॉर्नमुळे वैवाहिक संबंध बिघडण्याचे, जोडीदाराला धोका देण्याचे प्रमाण तब्बल 300 टक्यांनी वाढले आहे.
> पॉर्न बघितल्याने तुमच्या पार्टनरसोबतच्या रिलेशनशिपमधून रस कमी होतो. कारण तुम्हाला पॉर्नमधून क्षणिक सुख मिळवण्याची सवय लागलेली असते.
> स्ट्राएटम नावाचा भाग आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी प्रेरित करणाऱ्या मेंदूतल्या यंत्रणेचा महत्त्वाचा भाग आहे. पॉर्नच्या सवयीमुळे त्याचा आकार कमी होतो, त्यामुळे मेंदूतली ही यंत्रणा योग्य प्रकारे काम करत नाही. याशिवाय अशा लोकांमध्ये त्या भागाला मेंदूतल्या निर्णय घेणाऱ्या भागांशी जोडणारे दुवे कमजोर होत असलेले संशोधनात दिसून आले आहे.
> सतत पॉर्न पहिल्याने सतत सेक्स करण्याची इच्छा निर्माण होते, यासाठी एक तर पत्नीवर दबाव आणला जातो किंवा सतत नवीन शिकार शोधण्याचा प्रयत्न होतो. यामुळे हातून एखादा गुन्हा होण्याची शक्यता असते. (हेही वाचा: अबब ! 30 टक्के महिला पॉर्नच्या आहारी; Pornhub ला भेट देणाऱ्यांमध्ये भारताचा तिसरा नंबर)
> तुम्ही पॉर्न पाहता किंवा कोणत्या प्रकारचे पॉर्न पाहता या गोष्टी चेक केल्या जातात. पॉर्न साइट सर्च केल्यानंतर काही 'मालवेअर' तुमची सिस्टिम लॉक करतात ज्यातून तुम्ही सर्च केलेल्या पॉर्न साइटची माहिती त्यांना मिळते ज्याचा उपयोग ते खंडणी मागण्यासाठी करू शकतात.
> अश्लिल वेबसाइट किंवा अन्य ऑनलाइन डेटिंग साइट असो, त्यावरील तुमच्या प्रोफाइलचा तुमच्याविरोधात गैरवापर होऊ शकतो. यापूर्वी जेव्हा या साइटचा डेटा लीक झाला होता तेव्हा अनेकांचे आयुष्य धोक्यात आले होते.