आर्थिक दिवाळखोरीमध्ये बुडालेल्या एअर इंडिया (Air India) कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी न बोलण्याची धमकी दिली आहे. अन्यथा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारासुद्धा दिला आहे.
मुख्य व्यवस्थापकीय संचालकांच्या परवानगशिवाय प्रसारमाध्यमांशी कर्मचाऱ्यांनी बोलू नये असे न केल्यास कारवाई केली जाईल अशी धमकी दिली आहे. मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार कर्मचाऱ्यांनी कंपनीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यामुळे 30 एप्रिल ही शेवटची मुदत कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती.(मुंबई: जेट एअरवेज कर्मचार्यांचे आझाद मैदान येथे आंदोलन)
त्यामुळे कंपनी संबंधित कोणतीही पोस्ट किंवा खाजगीरित्या कर्मचाऱ्यांनी बोलू नये असे सांगण्यात आले होते. तर आदेशाचे उल्लंघन केल्यास कर्मचाऱ्यांवर कंपनीच्या नियमांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले होते.