An army convoy (Photo Credits-Twitter)

भारत-चीन (India-China) मधील परिस्थिती हळूहळू सामान्य होत चालली आहे. चीनच्या सैनिकांनी पूर्व लद्दाखच्या गलवान घाटीतून काही किमी अंतरापासून आपले तंबू पाठी घेण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी चीनी सेना पेट्रोलिंग प्वाईंट (PP)-17 येथून पाठी हटली आहे. यापूर्वी चीनी सैनिकांनी PP-14, PP-15 येथून माघार घेतली होती. भारताने चीनच्या विरोधात घेतलेल्या निर्णयानंतर आता चीनचे सैन्य तीन जागांवर मागे हटले आहे. त्याचसोबत चीनने त्यांच्या सैनिकांच्या संख्येत सुद्धा घट केली आहे.(India-China border Tension:तर महागात पडेल; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला लद्दाख प्रश्नी इशारा)

यापुर्वी पूर्व लद्दाखच्या हॉट स्प्रिंग मध्ये चीनने त्यांचे तंबू उभारले होते ते हटवले होते. भले चीन पाठी हटले असले तरीही भारतीय सैन्याकडून चीनच्या हालचालींवर लक्ष आहे. तसेच क्षेत्रात होणाऱ्या हालचालींबाबत सुद्धा भारतीय सैन्य अलर्ट आहे.(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लेह भेटीनंंतर चीनी सैन्य गलवान खोर्‍यातुन मागे हटले- भारतीय सैन्य)

दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराज्य मंत्री वांग यी यांच्या मध्ये गेल्या रविवारी फोनच्या माध्यमातून बातचीत झाली होती. त्यानंतर सैनिकांनी पाठी हटण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले होते. या बातचीतमध्ये दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या फेस ऑफच्या सर्व ठिकाणाहून पाठी हटण्याच्या निर्णयावर सहमती दर्शवली. डोवाल आणि वांग हे सीमांसंबधित गोष्टींसाठी नेमण्यात आलेले विशेष प्रतिनिधी आहेत. त्याचसोबत गलवान खोरे, हॉट स्प्रिंग, गोग्रा आणि पैंगोंगा सो ते फिंगर क्षेत्रातून चीनी सैन्य पाठी हटले आहे.