Rahul Gandhi | (PTI)

काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लद्दाख प्रश्नावरुन केंद्र सरकारला इशारा दिला आहे. लद्दाख येथील देशभक्त नागरिक चीनच्या घुसखोरीविरुद्ध आवाज उठवत आहेत. त्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करु नका. त्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करण्याची मोठी किंमत भारताला चुकवावी लागू शकते, अशा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे. राहुल गांधी हे काँग्रेसचे माजी अध्यक्ष असल्यामुळे त्यांची मते गांभीर्याने घेतली जाता.

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी यांनी एका वत्ताचा हवाला देत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे की,'देशभक्त लद्दाखवासी चीनी घुसखोरीविरुद्ध आवाज उठवत आहेत. ते केंद्र सरकारकडून मोठी आपक्षा करत आहेत. या देशभक्तांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणे भारताला महागात पडू शकते. मोठी किंमत चुकवावी लागू शकते.'

राहुल गांधी यांनी पुढे म्हटले आहे की, 'कृपा करुन लद्दाखमधील देशभक्तांचे ऐका'. राहुल गांधी यांनी ज्या वृत्ताचा हवाला दिला आहे त्या वृत्तात चीनने लद्दाख परिसरात मोठ्या प्रामाणावर घुसखोरी केल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा, भाजपा Make In India म्हणते मात्र प्रत्यक्षात चीनकडूनच खरेदी करते- राहुल गांधी)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपसून लद्दाख प्रदेशात चीनने घुसखोरी केली आहे. या वेळी चीन आणि भारत या दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झटापट झाली. या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. या वेळी चीनच्या सैन्याचीही मोठी हानी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्याला चीनकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.