Ladakh sector of LAC | (Photo Credits: AFP)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 3 जुलै रोजी लेह (Leh) लद्दाख मध्ये भारतीय जवानांना भेट देऊन त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. लद्दाख मध्ये निमू (Nimoo) येथून जवानांना संबोधित करताना त्यांनी चीनला इशारा देखील दिला होता. यानंतर दोन्ही देशातील उच्च अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्च, वाटाघाटी आटोपून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कॉर्प्स कमांडरच्या बैठकीनंतर गलवान खोर्‍यातुन चीनची सैन्य वाहने, तंबू आणि सैनिक एक ते दोन किलोमीटरपर्यंत मागे हटले आहेत. भारतीय लष्करातील सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे. मात्र चिनी सैन्य वाहने अजूनही या भागामध्ये आहेत. या सर्व परिस्थितीवर भारतीय सैन्य बारीक लक्ष ठेवुन आहे.

प्राप्त माहिती नुसार,दोन्ही देशांच्या सैन्याने आता या ठिकाणहुन मागे हटण्याबाबत सहमती दर्शविली आहे. गलवान खोऱ्याजवळ आता एक बफर झोन बनविला गेला आहे. PM Narendra Modi Leh Visit: विस्तारवादामुळे जगाचं मोठं नुकसान, आता विकासयुग सुरू झालंयं; PM नरेंद्र मोदी यांनी वाढवलं भारतीय जवानांचं मनोधैर्य

ANI ट्विट

दरम्यान, भारत-चीन संघर्षात गलवान खोर्‍यात तब्बल 20 जवान शहीद झाले होते. चीन च्या सुद्धा अनेक जवांंनाचा मृत्यु झाला होता. या जवानांचे बलिदान फुकट जाऊ देणार नाही, जशाच तसे उत्तर दिले जाईल अशा शब्दात मोदींनी चीनला सुनावले होते.