Representative Image

सिमकार्डच्या अवैध व्यापारात गुंतलेल्या आणि फसवणूक करणाऱ्यांचे सिंडिकेट उद्ध्वस्त केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दिली आहे. हे सिंडीकेट इंदिरा गांधी इंटरनॅशनल (IGI) विमानतळावर सक्रीय होते. आरोप आहे की, हे सिंडकेट सामान्य नागरिकांच्या नावावर सीमकार्ड खरेदी करत आणि गेमिंग ॲप्स आणि सोशल मीडिया नफेखोरीसाठी व्हिएतनाममधील वापरकर्त्यांना अधिक किमतीला विकत असत. विमानतळ पोलिसाच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या तपासणीत या सिंडीकेटचा भांडाफोड झाला. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील येका व्यक्तीच्या संशयास्पद कृतीमुळे हे प्रकरण उघडकीस आले.

इंदिरा गांधी इंटरनॅशनल (IGI) विमानतळावरील डीसीपी विमानतळ उषा रंगनानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, IGI कार्गो टर्मिनल येथील FedEx कुरिअरच्या ऑपरेशन्स मॅनेजरच्या तक्रारीनंतर तपास सुरू करण्यात आला. दिल्ली पोलिसांनी केलेल्या तपासात व्हिएतनामला पाठवण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात सिम कार्ड्स लपवून ठेवलेल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पुढे आले की, आरोपींनी खोटी कारणे देऊन खरेदी केलेली सिमकार्ड प्रामुख्याने लोहा मंडी, आग्रा, उत्तर प्रदेश येथे राहणाऱ्या व्यक्तींच्या नावाने जारी करण्यात आले होते. या भागात टाकण्यात आलेल्या छाप्यांमुळे हे उघड झाले की मुकुल कुमार नावाच्या संशयिताने फसव्या मार्गाने सिमकार्ड मिळवले होते, ज्याने आर्थिक फायद्यासाठी संशयित व्यक्तींचे शोषण केले होते. (हेही वाचा, Fake Drug Racket Busted: कॅन्सर बरा करण्याचा दावा, बनावट औषधे विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; दिल्ली पोलिसांची कारवाई)

आरोपी हे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर सीम कार्ड खरेदी करत आणि ते व्हिएतनाममध्ये पाठव असत. बंदी घातलेल्या Binance ॲपसह क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्मच्या वापराने आरोपींची या प्रकरणातील आणखी एक कडी पुढे आली आहे. या प्रकरणी मुकुल कुमार, हेमंत, कन्हैया गुप्ता आणि अनिल कुमार यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली आहे. अतिरिक्त तपशील उघड करण्यासाठी आणि भारतभर नोंदवल्या गेलेल्या अशाच फसवणुकीच्या कृत्यांमध्ये आरोपींचा सहभाग किती प्रमाणात आहे हे तपासण्यासाठी तपास चालू आहे.