
कांदा आणि टोमॅटो भाववाढीमुळे आधिक नागरिक त्रस्त आहेत. त्यात आता अजून भर पडली असून लसूणचे दर सुद्धा वाढले आहेत. दिल्ली येथे लसूणचे दर 300 रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत. सध्या लसूणचा घाऊक दर गेल्या दोन आठवड्यात बदलला नाही. मात्र लसूणची खरेदी किंमत 200-300 रुपये प्रति किलो झाली आहे. जे गेल्या दोन आठवड्यात 150-200 रुपये प्रति किलो होती.
देशात यंदाचे लसूणचे दर हे गेल्या वर्षापेक्षा 76 टक्के अधिक झाले तरीही किंमतीत वाढ झाली आहे. देशातील लसूणची प्रमुख बाजारपेठ मध्य प्रदेशातील नीमीच, मंदसौर आणि राजस्थान मधील कोटा येथील व्यापाऱ्यांनी असे सांगितले की, पावसामुळे लसूणची करण्यात आलेली साठवण खराब झाल्याने त्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळेच लसूणच्या दरात वाढ झाली आहे.दिल्लीच्या मदर डेयरी बूथवर लसूण 300 रुपये प्रति किलोने विकला जात आहे. तर दिल्ली एनसीआर मधील भाज्यांच्या दुकानात लसूणचे दर 250-300 रुपये ठेवण्यात आला आहे. लसूणच्या प्रमुख उत्पादकांनी राजस्थान आणि मध्य प्रदेशासह अन्य ठिकाणी किरकोळ भाव 200 रुपयांपेक्षा अधिक आहे.दरम्यान शनिवारी विविध क्विंटल प्रमाणे लसूणचा दर 8,000-17,000 रुपये क्विंटल होता. तर स्पेशल क्वालिटीच्या लसूणची किंमत 21,700 रुपये प्रति क्विंटल होती.(कांद्यानंतर आता टोमॅटोच्या दरात भाव वाढ, नागरिक त्रस्त)
तर देशाची राजधानी दिल्ली येथे टोमॅटोचा तुटवडा भरुन काढण्यासाठी शु्क्रवार पासून सफलच्या आउटलेटमध्ये स्वस्त दरात टोमॅटो उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच सरकारने एक पथक तयार केले असून त्यानुसार साठवून ठेवलेल्या टोमॅटोवर लगाम लावण्यात येणार आहे. सफलच्या आउटलेटमध्ये 25 रुपयात 200 ग्रॅम टोमॅटो प्युरीचे पॅक मिळणार असून ते 800 ग्रॅम टोमॅटोच्या बरोबर आहे. टोमॅटो प्युरीमधील सर्वात मोठा पॅक 825 ग्रॅमचे एक पॅक 85 रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. जे 2.5 किलो टोमॅटोबरोबरचा असणार आहे.