दिल्लीत नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधातील आंदोलनामुळे CBSE ची परीक्षा रद्द, जाहीर केले नवे वेळापत्रक
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) विरोधात सोमवारी जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. तसेच आंदोलनाला हिंसक वळण लागले असून आंदोलनकर्त्यांकडून गोळीबार आणि दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी मौजपूर आणि जाफराबाद येथे घडला. याच कारणास्तव दिल्लीतील शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. तर आंदोलन करण्यात येणाऱ्या परिसरातील काही शाळा हे परिक्षाकेंद्रासाठी निवडण्यात आले होते. मात्र आंदोलनामुळे शाळेतील परिक्षा, CBSE ची परिक्षा सुद्धा रद्द करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांनी दिल्लीतील नॉर्थ इस्टमधील शाळेतील परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सरकारी आणि खासगी शाळा सुद्धा बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बोर्डाच्या परिक्षेचा पेपर रद्द करण्यात आला आहे. सोमवारी 12 वीचा शारिरीक शिक्षण आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचा उर्दू, पंजाबी, बंगाली, तमिळ, तेलगू, मराठी आणि अन्य भाषांचा पेपर होता. विद्यार्थी पेपरसाठी सुद्धा आले होते पण दुपारी परिस्थिती बिघडत चालल्याचे दिसुन आले. त्यामुळेच आता परिस्थिती पूर्ववत होत नाही तोपर्यंत परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.(दिल्ली हिंसाचार: 8 राऊंड फायरिंग करणारा तरूण 'शाहरूख' पोलिसांच्या अटकेत)

शिक्षण निर्देशालयच्या परिक्षा विभागाने एक नोटीस जाहीर केली आहे. त्यानुसार सातवी, आठवी आणि 11 वीची 25 फेब्रुवारीला होणारी परिक्षा रद्द केली आहे. तर ही परिक्षा आता 25 फेब्रुवारी ऐवजी सातवीची 17 मार्च, आठवीची 14 मार्च आणि 11 वीची परिक्षा 23 मार्चला होणार आहे.