आघडी सरकार असलेल्या भारतीय जनता पार्टी (bjp) पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यामुळे भाजपकडून येत्या 26 फेब्रुवारी रोजी पक्षाकडून दिवाळी साजरी करणार आहे. तसेच 'कमल ज्योती' नावाच्या उत्सावाची तयारीसुद्धा भाजपकडून केली जात आहे. या उत्सावाच्या माध्यमातून सरकारकडून आयोजित केल्या गेलेल्या योजनांच्या लाभार्थ्यांच्या घरात दिवे लावले जाणार आहेत.
आज तक वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, येत्या निवडणुकीसाठी भाजपकडून जनेतेची जास्त मिळवण्यासाठीच्या प्रयत्नामुळे या गोष्टीचे आयोजन केले जात आहे. दरम्यान सुरु होणाऱ्या उत्सावादरम्यान मोदी सरकारच्या योजनांमधील लाभार्थ्यांच्या घरी कमल ज्योती लावण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचसोबत निवडणुकीसाठी भाजप पक्षालाच मतदान करा असे आवाहन नागरिकांना कार्यकर्त्यांकडून देण्यात येणार आहे.(हेही वाचा-विरेंद्र सेहवाग राजकारणाच्या मैदानात? हरियाणा राज्यातून भाजपसाठी करणार बॅटींग?)
तसेच 12- 22 फेब्रुवारी भाजप पक्षाकडून 'मेरा परिवार भाजपा परिवार' असे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून घराबाहेर पक्षाचे स्टिकर आणि झेंडे लावणार आहेत. तर येत्या 2 मार्च रोजी भाजप पक्षाची प्रत्येक विधानसभा क्षेत्रात बाईक रॅली काढण्यात येणार आहे.