Deepak Kochhar Tested COVID-19 Positive: चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना कोरोना व्हायरस संक्रमण, उपचारांसाठी AIIMS मध्ये दाखल; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी झाली होती अटक
दीपक कोचर (Photo Credits-ANI)

Deepak Kochhar Tested COVID-19 Positive: ICICI बँक आणि व्हिडिओकॉन प्रकरणी बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांनी ईडीने गेल्या आठवड्यात अटक केली होती. सध्या दीपक कोचर ईडीच्या ताब्यात आहेत. याच पार्श्वभुमीवर आता दीपक कोचर यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.(ICICI Bank-Videocon Case: आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना स्पेशल PMLA कोर्टाने सुनावली येत्या 19 सप्टेंबर पर्यंत ED कोठडी)

व्हिडिओकॉनचे निर्देशक वेणुगोपाल धूत यांची कंपनी व्हिडिओकॉनच्या विरोधात सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसा गेल्या वर्षात ईडीने मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण दाखल केले होते. त्याचसोबत ईडीने आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि दीपक कोचर यांच्या विरोधात सुद्धा तक्रार दाखल केली होती. या कारवाईनंतर जवळजवळ एका वर्षानंतर आता ईडीने दीपक कोचर यांना अटक केली आहे.(आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचा राजीनामा; संदीप बक्षी घेणार जागा)

दीपक कोचर सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. अटक केल्यानंतर त्यांना Special Prevention Of Money Laundering अंतर्गत कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. त्यानंतर कोर्टाने यावर निर्णय देत 19 सप्टेंबर पर्यंत त्यांची कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, दीपक कोचर हे आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती असून त्यांना व्हिडिओकॉनला देण्यात आलेल्या कर्जाप्रकरणी अटक करण्यात आली आहे.