ICICI Bank-Videocon Case: आयसीआयसीआय बँक- व्हिडिओकॉन प्रकरणी ईडीने (ED) सोमवारी बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर (Chanda Kochhar) यांचे पती दीपक कोचर (Deepak Kochhar) यांना अटक केली. यापूर्वी ईडीने दीपक कोचर यांना दिल्ली कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. दीपक कोचर यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर आज दीपक कोचर यांना कोर्टासमोर हजर केले असता त्यांना येत्या 19 सप्टेंबर पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.(आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचा राजीनामा; संदीप बक्षी घेणार जागा)
व्हिडिओकॉन ग्रुपला बँकेचे कर्ज देण्यामध्ये कथित अनियमितता आणि मनी लॉन्ड्रिंग संबंधित हे प्रकरण आहे. या वर्षात जानेवारी महिन्यात ईडीने चंदा कोचर, दीपक कोचर आणि त्यांचे सर्वस्व मालकी हक्क असलेल्या कंपन्यांची अशी तब्बल 78.15 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. यामध्ये महाराष्ट्र आणि तमिळनाडू येथे असलेले फ्लॅठ, जमीन, रोकड आणि मशीन्स यांचा यामध्ये समावेश आहे. व्हिडिओकॉन ग्रुप ऑफ कंपनीजला गैरकायद्याअंतर्गत 1875 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यासाठी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारवर ईडीने पीएमएमलए अंतर्गत प्रकरण दाखल करत तपास सुरु केला होता.
ICICI Bank-Videocon case: Deepak Kochar remanded to Enforcement Directorate custody till 19th September, by Special PMLA Court#Mumbai https://t.co/GPVfLUu5mZ
— ANI (@ANI) September 8, 2020
दीपक कोचर यांना करण्यात आलेली अटक ही व्हिडिओकॉन ग्रुपचे प्रमुख वेणुगोपाल धूत यांना ICICI बँकेकडून 3250 कोटी रुपयांचे कर्ज देण्याप्रकरणी आहे. या प्रकरणातील प्रथमच हिच मोठी कारवाई झाली आहे. ईडीकडून ICICI बँकेच्या द्वारे व्हिडिओकॉन समूहाला देण्यात आलेल्या कर्जात अनियमितता आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि अन्य काही जणांच्या विरोधात तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वीच चंदा कोचर आणि दीपक कोचर यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. तसेच चंदा कोचर यांचे मेव्हणे यांची सुद्धा चौकशी करण्यात आली होती.(चंदा कोचर Videocon प्रकरणात दोषी; संचालक मंडळाने कारवाई करत केले बडतर्फ)
ईडीच्या मते तपासात असे समोर आले की, चंदा कोचर यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या द्वारे व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला मान्य झालेले 300 कोटी रुपयांच्या कर्जामधील 64 कोटी रुपये 8 सप्टेंबर 2009 रोजी दीपक कोचर यांच्या मालकिची नूपावर रिन्यूएबल्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये ट्रान्सफर केले होते. व्हिडिओकॉनने ही रक्कम कर्ज मंजूर झाल्यानंतर एका दिवसानंतर ट्रान्सफर केली होती. तसेच या रक्कमेतून दीपक कोचर यांच्या कंपनीने 10.65 कोटी रुपयांची कमाई केली होती.