प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-संग्रहित संपादित प्रतिमा)

उत्तर प्रदेशात (Utter Pradesh) ऐन लग्नसोहळ्यात एक्स-प्रियकराने प्रेयसीला गिफ्ट देण्यासाठी खरनाक युक्तीवाद केला. या आरोपी तरुणाने लग्नसमारंभात पोहचून तिच्यावर अॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

बस्ती जिल्हात लग्नसोहळा पार पडत होता. त्यावेळी आपल्या प्रेयसीला लग्नाचे गिफ्ट देण्यासाठी आपला पूर्वीचा प्रियकर आल्याने प्रेयसीला आनंद झाला. मात्र रिसेप्शन सुरु असताना भर लग्नवरातीच्या मंडळींसमोर प्रियकराने स्टेजवर जात प्रेयसीला प्रथम भेट दिली. त्यानंतर योग्य वेळ साधून प्रेयसीच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकून तेथून पळ काढला.

या स्थितीत पीडित तरुणीचा चेहरा 50 टक्क्यांपेक्षा जास्त भाजला आहे. तसेच तरुणीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. तर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. तर लवकरच आरोपीवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.