Cyclone Jawad: आज संध्याकाळपर्यंत 'जोवाड' चक्रीवादळ रौद्र रुप धारण करणार, ओडिशासाठी Red Alert जाहीर
Cyclone (Photo Credit-Twitter)

Cyclone Jawad:  उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिसाच्या किनारपट्टी परिसरात जोवाड चक्रीवादाळाने रौद्र रुप धारण केल्यास नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर अंदमान समुद्र आणि लगतच्या बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याच्या कारणास्तव पुढील काही तासात चक्रीवादळ अधिक तीव्र होणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसा, बंगालच्या खाडीत मध्य भागात उत्तर-पश्चिमच्या दिशेला ते पुढे सरकरणार असून त्यानंतर पावसाची सुरुवात होईल. परंतु पावसाच्या सरी बरसण्यापूर्वी जोवाद चक्रीवादळ अधिक वेग धरेल असा अंदाज आहे. तर ओडिशाच्या किनारपट्टीवर जोवाड चक्रीवादळ 4 डिसेंबर पर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओडिसा जिल्ह्याला 'रेड अलर्ट' आयएमडी कडून जाहीर करण्यात आला आहे.

Skymet नुसार, आज संध्याकाळ पर्यंत उत्तर आँध्र प्रदेश, ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर हवामान बिघडण्याची शक्यता आहे. त्यानंतर अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. एजेंसीचे असे म्हणणे आहे की, अनुकूल पर्यावरणीय परिस्थितीत जोवाड चक्रीवादळ खोल समुद्राच्या दिशेने जाईल. चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.(Maharashtra Rain and Weather Update: महाराष्ट्रात पावासाची रिपरिप, अनेक ठिकाणी कांदा, टोमॅटो शेतीला फटका, भाज्याही महागल्या)

Tweet:

हवामान वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की, जोवाड चक्रीवादळ भुस्खलनाच्या स्तरावर पोहचण्यापूर्वी रौद्र रुप धारण करु शकतो. याच कारणामुळे उत्तर आँध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिसाच्या किनारपट्टीवर चक्रीवादळामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.  दरम्यान, यापूर्वी सौदी अरेबियाने या चक्रीवादळाचे नाव 'जोवाड' ठेवावे असे सांगितले होते.