Rain | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) महाराष्ट्रात (Maharashtra ) जोरदार हजेरी लावली आहे. पावसाची रीपरीप सतत सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीला फटका बसला आहे तर बाजारात येणाऱ्या भाज्याही महागल्या आहेत. या पावसामुळे (Maharashtra Rain and Weather Update) प्रामुख्याने कांदा आणि टोमॅटो पिकाला फटका बसला आहे. दुसऱ्या बाजूला इतरही शेतमालाचे नुकसान झाले आहे. परिणामी शहरात येणारा भाजीपाला मोठ्या प्रमाणावर महागला आहे. मुंबई शहरात काल रात्रभर आणि आज पहाटेही हलका ते मध्यम पाऊस सुरु होता. हवामान विभागाने संभाव्य पावसाची शक्यता विचारात घेऊन मुंबईमध्ये आगोदरच यलो अलर्ट जारी केला आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. हवामान खात्याने दिलेली माहिती अशी की, दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव लक्ष्यदिवच्या परिसरात चक्रीवादळ सुरु आहे. त्यामुळे वातावरणात मोठा बदल होऊन पाऊस सुरु आहे. (हेही वाचा, Maharashtra Weather Forecast: थंडीच्या दिवसात पावसाला लहर,पालघर, नाशिक, धुळे नंदुरबारला ऑरेंज अ‌ॅलर्ट; मुंबईसह अनेक ठिकाणी हलक्या सरी)

कांदा, टोमॅटो शेतीला फटका

अनेक ठिकाणी पाऊस तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. प्रामुख्याने कांदा आणि टोमॅटो पिकावणाऱ्या शेतऱ्यांना याचा अधिक फटका बसला. कांद्याची प्रत खालावल्याने दरालाही मार बसत आहे. बाजारसमित्यांमध्ये विक्रिस असलेला कांदा सरासरी हजार ते आठशे रुपये प्रति क्विंटल इतक्या निचांकी दराने विकला जात आहे. कांदा दरात वाढ होण्याची शक्यता होती. मात्र, पावसामुळे जोरदार उटका बसला आहे आणि हे दर उतलले आहेत. टोमॅमटो पिकाबाबतही अशीच स्थिती आहे.

नंदुरबार जिल्ह्यात पावसाने कापूस आणि भात पिकाचे नुकसान केले आहे. शेतात असलेली मिरची, तसेच पथारीवर असलेल्या मिरचीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेआहे. रत्नागिरी जिल्ह्यात मच्छिमारांना मासेमारीसाठी समुद्रात जाता येत नाही. मासेमारी मोठ्या प्रमाणावर ठप्प आहे. त्यामुळे जवळपास 95% मच्छिमारांनी आपल्या बोटी किनाऱ्याला लावल्या आहेत.